Ind vs Aus 1st Test : भारताच्या 6 गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाचा एकटा पठ्ठ्या भारी, कांगारूंच्या आकडेवारीने टीम इंडियाची धाकधूक वाढली!
India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया खूप मेहनत घेत आहे.
India Fast Bowling vs Australia Fast Bowling Stats : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया खूप मेहनत घेत आहे. कारण टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ही मालिका किमान 4-0 ने जिंकावी लागेल. भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल तर वेगवान गोलंदाजांना अप्रतिम कामगिरी करावी लागेल. या मालिकेसाठी भारतीय संघाने आपल्या संघात सहा वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघात पाच वेगवान गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजीवर एक नजर टाकूया....
दोन्ही संघात असे वेगवान गोलंदाज आहेत जे कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतात. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत टीम इंडियाकडे अनुभवाची कमतरता दिसत आहे. एकीकडे टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंग युनिटमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, नितीश राणा आणि हर्षित राणा यांच्या नावांचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियन संघात जोस हेझलवूड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि मिचेल मार्श आहेत.
टीम इंडियाच्या सर्व सहा गोलंदाजांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये 265 विकेट घेतल्या आहेत. तरी दोन गोलंदाजांनी पदार्पणही केले नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या सर्व वेगवान गोलंदाजांच्या विकेट्स एकत्र घेतल्यास 983 विकेट्स आहेत. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेझलवूडने 273, मिचेल स्टार्कने 358, पॅट कमिन्सने 269, स्कॉट बोलँडने 35 आणि मिचेल मार्शने 48 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहकडे भारताकडून सर्वाधिक अनुभव आहे, ज्याने 77 डावात 173 विकेट घेतल्या आहेत.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार) (पहिल्या कसोटीतून बाहेर), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा.
राखीव खेळाडू : खलील अहमद, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी
मालिका वेळापत्रक
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामने होणार आहेत. पहिला सामना पर्थमध्ये 22 ते 26 नोव्हेंबर, दुसरा ॲडलेडमध्ये 6 ते 10 डिसेंबर, तिसरा सामना गाबामध्ये 14 ते 18 डिसेंबर , चौथा मेलबर्नमध्ये 26 ते 30 डिसेंबर आणि पाचवा आणि शेवटचा 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनी येथे खेळला जाईल.