CWG 2022: भारतीय महिला टेबल टेनिस संघाची विजयी घौडदौड, कॉमनवेल्थ स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकला!
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय महिला टेबल टेनिसपटूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलं आहे.
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय महिला टेबल टेनिसपटूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलं आहे. कॉमनवेल्थ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय माहिला संघानं गयानाचा 3-0 नं पराभव करत विजयी घौडदौड सुरू ठेवली. भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कामगिरी पाहता त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताची महिला टेबल टेनिस श्रीजा अकुला आणि रीथ टेनिसन यांच्या जोडीनं नताली कमिंग्स आणि चेल्सी एडघिल यांचा 11-5, 11-7, 11-7 असा पराभव केला. या विजयासह भारतानं 1-0 अशी आघाडी घेतलीय. गेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय टेबल टेनिसपटू मानिका बत्रानं नंतर थुरिया थॉमसचा 11-1, 11-3, 11-3 असा पराभव केला.दुसर्या सामन्यात रीथनं चेल्सी एडघिलविरुद्ध 11-7, 14-12, 13-11 असा विजय नोंदवून भारताला 3-0 अशी अभेद्य आघाडी मिळवून दिली.
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं पहिलं पदक जिंकलं
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं रौप्यपदक जिंकलंय. वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा पहिलवान संकेत सरगरनं रौप्यपदक जिंकून देशासाठी पहिलं पदक जिंकण्याचा मान मिळवला. ज्यामुळं संपूर्ण देशभरातून त्याचं कौतूक केलं जातंय. या स्पर्धेत भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली करत आहे. त्यांच्याकडूनही पदकांची अपेक्षा केली जात आहे.
मीराबाई चानूकडून पदकाची अपेक्षा
टोकियो ऑलिम्पिक-2022 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणारी मीराबाई चानूकडून बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी ती दुसरी खेळाडू महिला खेळाडू आहे. मीराबाई चानू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील तिचा पहिला सामना आज खेळणार आहे.
हे देखील वाचा-
- CWG 2022: कॉमनवेल्थमच्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचं दमदार प्रदर्शन, श्रीलंकेच्या निलुका करुणारत्नेला 2-0 नं नमवलं
- ICC T20 World Cup 2022: रविचंद्रन अश्विनचं टी-20 विश्वचषकात खेळणं कठीण; भारतीय माजी खेळाडूच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष
- CSK: महेंद्रसिंह धोनी, सीएसकेसह भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; स्टार खेळाडूची दुखापतीवर मात