(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asian Games 2023 : छेत्रीची कमाल, भारताचा बांगलादेशवर थरारक विजय, एशियन गेम्समध्ये उघडले खाते
IND vs BAN Football Match : भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बांगलादेश संघाचा पराभव केला आहे.
IND vs BAN Football Match : भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बांगलादेश संघाचा पराभव केला आहे. सुनिल छेत्रीच्या नेतृत्वातील भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत पहिला विजय मिळवलाय. याआधी चीनविरोधात झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण बांगलादेशविरोधात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत स्पर्धेत कमबॅक केले आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा १-० च्या फराकाने पराभव केलाय. भारतासाठी कर्णधार सुनिल छेत्री याने अखेरच्या क्षणी गोल केला. या गोलच्या बळावरच भारताने बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने 85व्या मिनिटाला केला. भारतीय संघाला चीनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी बांगलादेशचा म्यानमारविरुद्ध पराभव झाला होता.
भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामन्यात गोलसाठी चांगलीच झुंज पाहायला मिळाली. मात्र, भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने अखेरच्या क्षणी केला. या गोलमुळे भारतीय संघ बांगलादेशचा धुव्वा उडवण्यात यशस्वी झाला.
पहिल्या हाफमध्ये कायझ झाले... ?
भारत आणि बांगलादेश संघांच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत भारत-बांगलादेशच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण त्यांचा फायदा उठवण्यात अपयश आले. या सामन्याच्या पहिल्या 20 षटकांमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले, मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले.
सुनिल छेत्रीने पेनल्टी कॉर्नरवर एकमेव गोल केला
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय फुटबॉल संघाला यजमान चीनचे आव्हान होते. मात्र या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेश संघाला म्यानमारकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारत आणि बांगलादेश दोन्ही संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा होता. यामध्ये भारताने बाजी मारली. दुसऱ्या डावतही गोल होण्याची शक्यता दिसत नव्हती. सामना गोलविना बरोबरीत सुटण्याच्या दिशेने चालला आहे. मात्र सामन्याच्या 85व्या मिनिटाला सुनिल छेत्रीने गोल करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. सुनील छेत्रीने पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. एका गोलमुळे भारतीय संघाने विजय मिळवला.
1️⃣ Calm Penalty ✅
— Indian Football Team (@IndianFootball) September 21, 2023
3️⃣ Crucial Points ✅ @chetrisunil11’s goal from the penalty spot was enough to give the #BlueTigers 🐯 their first win in the #19thAsianGames 💙#INDBAN ⚔️ #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/nuHNhN07b3