एक्स्प्लोर
Harry Brook Girlfrined : हॅरी ब्रूकनं 'लेडी लक' समोर ठोकलं शतक, फारच सुंदर आहे या खेळाडूची गर्लफ्रेंड
Who is Harry Brook Girlfriend Lucy Lyles : आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकने 55 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. हॅरी ब्रूकच्या या शानदार खेळीदरम्यान त्याची गर्लंफ्रेड लुसी लाइल्सही स्टँडमध्ये उपस्थित होती.
Who is Harry Brook Girlfriend Lucy Lyles
1/10

Harry Brook Century Girlfriend Lucy Lyles Reaction : आयपीएल 2023 मधील 19 व्या सामन्यात हैदराबादने (SRH) कोलकाताचा (KKR) पराभव केला.
2/10

या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने (Harry Brook) हैदराबाद संघाकडून खेळताना आयपीएल 2023 (IPL 2023) मधील पहिलं शतक झळकावलं. 24 वर्षीय युवा खेळाडू हॅरी ब्रूकने दमदार शतकं ठोकलं.
3/10

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) यांच्यातील सामन्यात हॅरी ब्रूकने 55 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या.
4/10

हॅरी ब्रूकच्या या शानदार खेळीदरम्यान त्याची गर्लफ्रेंड लुसी लाइसही स्टँडमध्ये उपस्थित होती
5/10

हॅरी ब्रूकच्या दमदार शतकी खेळीनंतर त्याची गर्लफ्रेंड लुसीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या सामन्या दरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
6/10

हॅरी ब्रूकने त्याची गर्लफ्रेंड लुसी लाइल्ससमोर आयपीएल 2023 मधील पहिलं शतक ठोकलं. या खेळीनंतर लुसीच्या आनंदाला पारावार उरला नाही.
7/10

हॅरी ब्रूक आणि लुसी लाइल्स तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याने 2020 मध्ये पहिल्यांदा त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता.
8/10

हॅरी ब्रुकला सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 साठी 13.25 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलं. मात्र पहिल्या तीन सामन्यांमध्ये हॅरीची बॅट चालली नव्हती.
9/10

मात्र, कोलकाता विरुद्धच्या सामन्यात हॅरी ब्रूकने त्याच्या लेडी लकसमोर शतक ठोकलं. सनरायझर्स हैदराबादचा हॅरी ब्रूक आयपीएल 2023 मध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
10/10

हैदराबादचा या मोसमातील हा दुसरा विजय आहे. हॅरी ब्रूकच्या नाबाद 100 आणि मार्करमच्या 50 धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 4 बाद 228 धावा केल्या. ब्रूकने 55 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकार ठोकले.
Published at : 15 Apr 2023 11:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
करमणूक
बातम्या
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
