दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताच्या अंडर-19 संघाने आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकत चषकावर नाव कोरलं आहे.
2/8
या विजयासह भारतानं आठव्यांदा आशिया चषक खिशात घातलं आहे.
3/8
भारताने श्रीलंका संघाला 9 विकेट्सने मात देत हा सामना जिंकला आहे.
4/8
या सामन्यात नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
5/8
श्रीलंकेच्या संघाला 38 षटकात 106 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, डेकवर्थ लुड्सच्या नियमानुसार भारताला 102 धावांचे लक्ष्य मिळालं. हे लक्ष्य भारतीय संघानं एक विकेट्स गमावून 22 व्या षटकातच पूर्ण केलं.
6/8
भारताचा सलामीवीर हरनूर सिंह स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशीनं नाबाद 56 धावांची खेळी केली. यात सात चौकारांचा समावेश आहे.
7/8
अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. भारताच्या विजयाचं संपूर्ण देशभरातून कौतुक केलं जातंय.
8/8
या विजयानंतर अनेक माजी खेळाडूंसह सर्व स्तरातून भारतीय संघाच कौतुक करण्यात येत आहे. (P.C. - BCCI Twitter)