एक्स्प्लोर
Hardik Pandya : सूर्याच्या नेतृत्त्वात भारताच्या यंग ब्रिगेडची श्रीलंका मोहीम सुरु, हार्दिक पांड्याची विमानतळावर खास व्यक्तीला मिठी
Hardik Pandya: हार्दिक पांड्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी श्रीलंकेला रवाना झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ टी 20 मालिका खेळणार आहे.

हार्दिक पांड्याची अभिषेक नायरला मिठी
1/5

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
2/5

टी 20 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करणारा खेळाडू अक्षर पटेल देखील विमानतळावर पाहायला मिळाला. अक्षर पटेलवर दुहेरी जबाबदारी असणार आहे. अक्षर पटेलवर फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीची धुरा असेल.
3/5

कोलकाता नाईट रायडर्सचे सहाय्यक कोच असलेल्या अभिषेक नायर यांची भारताच्या सहायक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
4/5

2026 च्या टी वर्ल्ड कपची तयारी म्हणून भारतीय संघाची बांधणी करण्यात येत आहे. यामुळं टी 20 क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे.
5/5

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला. यावेळी हार्दिक पांड्यानं विमानतळावर भारतीय क्रिकेट टीमचे सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना मिठी मारली. हार्दिक पांड्यानं नताशा स्टॅनकोविक हिच्यासोबत घटस्फोट घेतल्याची घोषणा केल्यानंतर प्रथमच माध्यमांसमोर आला होता.
Published at : 22 Jul 2024 08:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
