एक्स्प्लोर
अभिमान, आनंद अन् बरंच काही, भारतीयांची मनं जिंकणाऱ्या अर्शदीपनं आईवडिलांच्या गळ्यात घातलं वर्ल्डकपचं मेडल
Arshdeep Singh : अर्शदीप सिंगनं भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्ड कप विजयाचा आनंद अर्शदीप सिंगनं आई वडिलांसोबत साजरा केला.

अर्शदीपनं मनं जिंकली
1/5

भारतानं टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं यामध्ये फलंदाजांप्रमाणं गोलंदाजांचं देखील महत्वाचं योगदान राहिलेलं आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला अर्शदीप सिंग यानं देखील महत्त्वाचं योगदान दिलं. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांनी भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली.
2/5

अर्शदीप सिंगनं फायनलमध्ये 4 ओव्हरमध्ये केवळ 20 धावा देत दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्क्रम आणि क्विंटन डी कॉक यांची विकेट घेत महत्त्वाची कामगिरी केली. क्विंटन डी कॉक यानं 39 धावांची खेळी केलेली असताना भारताला विकेटची आवश्यकता असताना अर्शदीप सिंगनं विकेट घेतली.
3/5

अर्शदीप सिंगनं भारतातर्फे दोन आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. दोन्ही स्पर्धांमध्ये अर्शदीप सिंगनं भारताकडून सर्वाधिक विकेट घतल्या. 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 10 विकेट घेतल्या.
4/5

अर्शदीप सिंगनं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या. फायनलमधील अर्शदीप सिंगचा स्पेल देखील ऐतिहासिक ठरला.
5/5

टीम इंडियानं सांघिक कामगिरीच्या जोरावर टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं. या विजयानंतर अर्शदीप सिंगनं विश्वविजयाचा आनंद आई वडिलांसोबत शेअर केला.
Published at : 02 Jul 2024 12:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नागपूर
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion