एक्स्प्लोर
PHOTO : न्यूयॉर्क हादरलं! ब्रुकलिन सबवे स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबार अन् स्फोट, अंगावर शहारा आणणारे फोटो

New York Attack
1/9

न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात 16 जण गंभीर जखमी झाले आहेत.
2/9

घटनास्थाळावरील एका फोटोत गोळीबारातनंतर अनेक लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचं दिसत आहेत.
3/9

अमेरिकन वेळेनुसार, सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
4/9

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या व्यक्तीनं बांधकाम कामगारासारखे कपडे घातले होते आणि तोंडावर गॅस मास्कही लावला होता. त्याच्या हातात गन होती आणि तो काही बॉम्ब घेऊन स्टेशनमध्ये घुसला होता.
5/9

गोळीबारानंतर पोलिसांनी स्टेशनवर सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यात काही बॉम्बही सापडले.
6/9

न्यूयॉर्क पोलीस विभागाची कमांडो टीम मेट्रो स्टेशनमध्ये तैनात करण्यात आली आहे. एफबीआयची टीमही घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी चौकशी सुरु केली.
7/9

गोळीबाराच्या घटनेनंतर न्यूयॉर्कमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
8/9

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर मेट्रोस्टेशनवर स्फोटही झाला आहे. त्यामुळे या परिसरासह शहरातील सर्व मेट्रो स्टेशनवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
9/9

दरम्यान, या गोळीबार प्रकरणी न्यूयॉर्कमधून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो स्टेशनवर झालेला हल्ला दहशतवादी हल्ला आहे.
Published at : 13 Apr 2022 09:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
विश्व
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
