एक्स्प्लोर
Maharashtra Gas Leakage: अंबरनाथमध्ये वायूगळती, कंपनीत पाऊल ठेवताच दिसले केमिकलने भरलेले चंबू अन् उग्र दर्प
Ambernath MIDC: निकाकेम केमिकल कंपनी ही दिवसा सुरू असते रात्री कंपनी बंद असते.

Ambernath MIDC
1/7

अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील मोरीवली येथील निकाकेम केमिकल कंपनीतून रासायनिक मिश्रित केमिकल हवेत पसरल्याने नागरिकांच्या घशात खवखव आणि डोळ्यात जळजळ झाल्याची तक्रार समोर आली.
2/7

12 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत अंबरनाथ शहरात केमिकल पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
3/7

निकाकेम केमिकल कंपनी ही दिवसा सुरू असते रात्री कंपनी बंद असते. कंपनीच्या परिसरात ऑइलचे ड्रम ठेवण्यात आले आहेत.
4/7

उष्णतेमुळे यात केमिकल मिश्रण झाल्याने हवेत वायू पसरला असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
5/7

वायू प्रदूर्शन मंडळाच्या दोन हवा तपासणी मोबाईल व्हॅन वायू तपासणी करत असून ही तपासणी 24 तास सुरू राहणार आहे.
6/7

नेमका वायू कोणता आहे, याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. परिस्थिती नियंत्रित असली तरीही कंपनीच्या आत धूर निघत असून उग्र स्वरूपाचा वास येत आहे.
7/7

वायू प्रदर्शन मंडळाने फिरते वातावरणीय हवा गुणवत्ता मापक वाहन उभे केले असून 24 तासांनी रिपोर्ट येणार आहे.
Published at : 13 Sep 2024 12:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्रीडा
पालघर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion