एक्स्प्लोर
Ratnagiri News: कोकणात नांगरणी स्पर्धा; गुडघाभर चिखलात सर्जा-राजाचा थरार, पंचक्रोशीतून 40 ते 50 बैल जोड्या सहभाग
सध्या कोकणामध्ये पावसाची संततधार सुरू आहे.त्यात शेतातील गुडघ्याभर चिखलात सर्जा-राजाचा थरार पाहायला मिळत आहे.

Ratnagiri news
1/10

पंचक्रोशीतून 40 ते 50 बैल जोड्या सहभाग घेतात ही स्पर्धा कोकणामध्ये नांगरणी स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
2/10

ही स्पर्धा पाहण्यासाठी तुफान गर्दी होते. या स्पर्धेत धावण्याचा पहिला मान त्याच गावातील बैल जोडीला दिला जातो आणि त्यानंतर सुरू होतो बाहेरून आलेल्या बैल जोड्यांचा थरार
3/10

या स्पर्धेसाठी काही एकरांचे खास शेत तयार केलं जातं.स्पर्धेच्या सुरुवातीला स्पर्धेमध्ये सहभागी होणारे घाटी आणि गावठी बैल जोड्या या मोठ्या शेतातून नांगरसह फिरून या शेतातील मैदानात चिखल केला जातो.
4/10

गुडघाभर चिखल झाल्यानंतर याच शेतातील मैदानाच्या मध्यभागी झेंडे लावून दोन भागांत नांगरणी स्पर्धा खेळवली जाते.स्पर्धेत जिल्ह्यातील चाळीस गावठी आणि घाटी बैल जोड्या सहभागी होतात.
5/10

सहभागी झालेल्या गावठी जोडीला या स्पर्धेचा पहिला मान दिला जातो.एका मागोमाग एक स्पर्धक आपली बैलजोडी घेऊन या शेतातील मैदानात उतरतो.
6/10

घड्याळाच्या कमीत-कमी मिनिटांमध्ये तो मैदानाच्या वेगाने टोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो स्पर्धक करतो.या प्रयत्नात काही स्पर्धक या चिखलामध्ये पडतात.
7/10

चिखलातून बेभान होणाऱ्या बैलाप्रमाणेच शेतकऱ्याला ही धाव लागत. मग यात चिखलात बैलही त्याला लोळवतात.
8/10

अगदी ऑलम्पिकसारखं एका सेकंदाच्या फरकाने घेतल्या बैल जोड्या विजयी होतात. मग गुलाल उडवून सेलिब्रेशनला सुरुवात होते.
9/10

गावठी बैलजोडी स्पर्धक संपल्यानंतर त्याच ठिकाणी घाटी बैल जोड्या पळवल्या जातात एका मागून एक स्पर्धक आपली जोडी घेऊन मैदानात उतरतो
10/10

नांगरलेल्या शेतात ग्रामस्थ लगेच लावणी करतात.शेतीच्या कामातून थोडीशी उसंती घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा म्हणजे एखाद्या जत्रेपेक्षा कमी नसते.
Published at : 16 Jul 2023 10:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
