एक्स्प्लोर
MLC Election : झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर यांना कैलास गोरंट्याल यांची मिठी,भाजपचे गणपत गायकवाड वेटिंगवर, विधानभवनात काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election Voting : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु आहे. झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर हे दोन्ही काँग्रेसचे आमदार पक्ष कार्यालयात दाखल झाले होते.

विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काय घडतय?
1/5

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी काल पक्षाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. आज विधानमंडळात आल्यावर त्यांनी काँग्रेस पक्ष सांगेल त्याला मतदान करणार असल्याचं म्हटलं. विधानभवनातील पक्ष कार्यालयात आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांना मिठी मारली.
2/5

काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर हे देखील पक्ष कार्यालयात दाखल झाले. यावेळी कैलास गोरंट्याल यांनी त्यांचं स्वागत केलं. पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील जितेश अंतापूरकर यांची पाठ थोपटली.
3/5

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा देणारे आमदार शंकरराव गडाख आदित्य ठाकरे यांच्यासह मतदानासाठी रवाना झाले.
4/5

शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड विधानभवनात दाखल झाले. मात्र, काँग्रेसनं केलेल्या तक्रारीमुळं केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश येईपर्यंत त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं आहे.
5/5

लोकसभा निवडणुकीपासून भाजपकडून दुरावलेले आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील भाजप कार्यालयात दाखल झाले. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह ते दिसून आले.
Published at : 12 Jul 2024 01:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
