एक्स्प्लोर
Rahul Gandhi Rides Bike: राहुल गांधींची लडाख दौऱ्यादरम्यान बाईकस्वारी; फोटोंमधून पाहा हटके अंदाज
Rahul Gandhi Bike Ride: राहुल गांधींचे बाईक चालवतानाचे काही फोटो समोर आले आहेत, सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. यावेळी राहुल गांधींचा हटके स्वॅग पाहायला मिळाला.

Rahul Gandhi Bike Ride in Ladakh
1/11

काँग्रेस नेते राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी (19 ऑगस्ट) त्यांनी लडाख ते पँगॉन्ग लेकदरम्यान त्यांनी बाईक चालवली.
2/11

राहुल गांधी यांना बाईक चालवण्याची आवड आहे, याबाबत त्यांनी स्वतः सांगितलं आहे. राहुल गांधींनी नुकतंच दिल्लीतील करोल बाग भागात मोटर मेकॅनिकशी संवाद साधला होता.यादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की, त्यांना बाईक चालवायला खूप आवडते.
3/11

राहुल गांधी म्हणाले होते की त्यांच्याकडे केटीएम बाईक आहे, पण ती तशीच पडून आहे आणि सुरक्षेमुळे त्यांना चालवता येत नाही.
4/11

सहसा राहुल गांधी पांढऱ्या टी-शर्टमध्येच दिसतात. पण बाईक राईडदरम्यान त्यांनी निळ्या रंगाचं जॅकेट आणि स्पोर्ट्स ट्राउजर घातली होती, सोबत स्पोर्ट्स बाईक हेल्मेट देखील घातलं होतं.
5/11

लडाखमध्ये राहुल गांधींनी एका कार्यक्रमातही सहभाग घेतला, यावेळी स्थानिकांसोबत त्यांनी बातचीत केली.
6/11

यासोबत राहुल गांधींनी लेहमध्ये फुटबॉलचा सामनाही पाहिला. कॉलेजच्या काळात राहुल गांधी हे उत्तम फुटबॉलपटू राहिले आहेत.
7/11

राहुल गांधी केवळ दोन दिवसांसाठी लडाख दौऱ्यावर आले होते, केवळ 17 आणि 18 ऑगस्टला ते लडाख दौऱ्यावर होते. परंतु त्यांनी हा दौरा आठ दिवसांनी वाढवला आहे. आता 25 ऑगस्टपर्यंत राहुल गांधींनी केंद्रशासित प्रदेशात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
8/11

राहुल गांधींच्या वडिलांची, म्हणजेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 20 ऑगस्ट रोजी जयंती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी वडिलांचा वाढदिवस पँगॉन्ग लेकवर साजरा करणार आहेत.
9/11

लेहमध्ये राहुल गांधींनी एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता, यात त्यांना पारंपरिक नृत्य देखील केलं.
10/11

लेहमधील कुशोक बकुला फुटसल स्टेडियमवर 'राजीव गांधी फुटसल टूर्नामेंट 2023'च्या अंतिम सामन्याला उपस्थित असताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी तरुणांसोबत संवाद साधला.
11/11

अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत देखील राहुृल गांधींनी हजेरी दर्शवली.
Published at : 19 Aug 2023 10:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
