एक्स्प्लोर
आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात मुंबईत आंदोलन; पाहा फोटो

aarey protest
1/7

मुंबईतील आरे जंगलात पुन्हा मेट्रोसाठी कारशेड बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिंदे गट आणि भाजप सरकारने त्यासाठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे ऐवजी कांजूरमार्ग व इतर पर्याय पाहण्यास सुरुवात केली होती.
2/7

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी आज आरे जंगलात आंदोलन केले. मेट्रो कारशेड कांजूरमार्ग अथवा इतरत्र नेण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली
3/7

या आंदोलनात तरुणाई मोठ्या प्रमाणावर उतरली होती. त्याशिवाय स्थानिक आदिवासींनीदेखील आंदोलनात सहभाग घेतला. आरे जंगलातील जैवविविधतेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
4/7

आकर्षक पोस्टर, बॅनर , गाणी, घोषणाबाजी या वेळी करण्यात आली.
5/7

या आंदोलनात चिमुकलेही सहभागी झाले होते. त्यांच्या हातात पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे पोस्टर होते.
6/7

विकासाला, मेट्रोला विरोध नाही. मात्र, पर्यावरणाची हानी नको अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
7/7

भाजप वगळता जवळपास इतर सर्वच राजकीय पक्षांनी आरेतील मेट्रो कारशेडला विरोध दर्शवला आहे.
Published at : 03 Jul 2022 04:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
