एक्स्प्लोर
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Prayagraj Mahakumbh Stampede PHOTO: 29 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजता प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. या अपघातात अनेक लोक जखमी झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

Prayagraj Mahakumbh Stampede PHOTO
1/7

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर प्रशासकीय युनिट्स घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं.
2/7

प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की, 50-80 लोक जखमी झाले आहेत.
3/7

मिळालेल्या माहितीनुसार, डायवर्जन केलेल्या घाटांवर लोक जाऊ इच्छित नव्हते. सर्वांना संगमावरच स्नान करायचं होतं, त्यामुळे एकाच ठिकाणी ओव्हर क्राउडिंग झालं आणि मोठी चेंगराचेंगरी झाली.
4/7

जखमींना महाकुंभातील केंद्रीय रुग्णालयात आणलं जात आहे. आतापर्यंत किती लोक जखमी झाले आहेत, याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अनेकजण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5/7

संगम घाटाकडे कोणीही जाऊ नये, अशा जत्रेच्या परिसरात सतत अनाउन्समेंट केल्या जात आहेत. लोकांनी शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.
6/7

मौनी अमावस्येच्या शाही स्नानामुळे महाकुंभात 8-10 कोटी लोकांची गर्दी पोहोचली होती.
7/7

आता प्रश्न असा येतो की, ही घटना कशी घडली? यावर एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, ही दुर्घटना स्नान घाटावर घडली. ही घटना 1 वाजता घडली. गर्दी एवढी झाली की, लोक एकमेकांच्या अंगा-खांद्यावर चढले. काही लोकांनी माझी मदत केली आणि मग आम्ही वाचलो.
Published at : 29 Jan 2025 06:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
