एक्स्प्लोर
पाहा फोटो: 20 फूट उंच, 9500 वजन, नवीन संसद भवनातील अशोक स्तंभाचे PM मोदी यांच्या हस्ते अनावरण

National Emblem cast on new Parliament building
1/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनावरील राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभाचे अनावरण केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरलादेखील उपस्थित होते.
2/6

राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभ हे 9500 किलो वजनाचे असून तांब्याचे आहे. याची उंची 6.5 मीटर आहे. नवीन संसद भवनाच्या छतावर बसवण्यात आले आहे. या स्तंभाच्या भोवती जवळपास 6500 किलोचा स्टील प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे.
3/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संसद भवनाच्या छतावरील राष्ट्रीय प्रतिकाचे अनावरण केले.
4/6

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
5/6

नवीन संसद भवनाचे बांधकाम नियोजनानुसार सुरू आहे. जवळपास 62 टक्के काम पूर्ण झाले आहे.
6/6

नवीन संसद भवनाचे उद्घाटन 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन नवीन संसद भवनात होणार असल्याची शक्यता आहे.
Published at : 11 Jul 2022 05:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
