एक्स्प्लोर
Tulsi Tea : हिवाळ्यात घसादुखी, खवखव यांमुळे त्रस्त्त आहात? तुळशीच्या पानांचा चहा ठरेल रामबाण उपाय
Winter Health Tips : हिवाळ्यात थंड मोसमात शरीरासंबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. हिवाळ्यात अनेक जुनी दुखणी जसे काही सांधेदुखीची समस्याही अनेकांना सतावते.

Tulsi Tea Benefits ( PC : istockphoto.com )
1/9

हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्दी आणि घशासंबंधित समस्या अनेकांना सतावतात. घसा खवखवणे, घसा दुखणे हा त्रास बहुतेकांना होता. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. ( PC : istockphoto.com )
2/9

हिवाळ्यात घसादुखी, खवखव यांमुळे त्रस्त्त असाल तर तुळशीच्या पानांचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या समस्येपासून तुम्हाला झटपट सुटका मिळेल.( PC : istockphoto.com )
3/9

तुळस ही औषधी वनस्पती आहे. आरोग्यासाठी तुळशीचे औषधी गुणधर्म साऱ्यांनाचा माहित आहेत.( PC : istockphoto.com )
4/9

तुळशी, मसाले आणि मध यांपासून बनलेला चहा हा अँटिऑक्सिडंटने समृद्ध असतो. हा चहा रोग प्रतिकारशक्ती आणि ऍलर्जी आणि बदलत्या ऋतूतील परिणामांशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.( PC : istockphoto.com )
5/9

तुळशीचा चहा तयार करण फार सोपं आहे. यासाठी सर्वात आधी एका भांड्यात दोन ते तीन कप पाणी घ्या. यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकून चांगलं उकळवा.( PC : istockphoto.com )
6/9

तुळशीची सात ते आठ पाने स्वच्छ धुवून ती उकळत्या पाण्यात घाला. यामध्ये तुम्ही तुळशीच्या पानांसह जायफळ आणि छोटी लिंबाची फोड घाला. ( PC : istockphoto.com )
7/9

हा चहा झाकून ठेवा आणि तीन मिनिटे चहाला चांगलं उकळवून घ्या.( PC : istockphoto.com )
8/9

आता हा चहा गाळून घ्या. यामध्ये मध मिसळल्यावर तुमचा गरमागरम तुळशीच्या पानांचा चहा तयार आहे.( PC : istockphoto.com )
9/9

तुळशीच्या वनस्पतीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात. यामुळे तुम्हाला सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळेल. ( PC : istockphoto.com )
Published at : 20 Dec 2022 02:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
