एक्स्प्लोर
Health Tips: डाळिंब खाल्ल्याने शरीराला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे; अनेक आजार राहतील दूर
Pomegranate Benefits: फळांमध्ये डाळिंब हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी डाळिंबाचे दाणे खाण्याचा किंवा त्याचा रस पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.

Pomegranate Benefits
1/8

डाळिंब रक्तदाब संतुलित करते. दोन आठवडे दररोज 150 मिली डाळिंबाच्या रसाचं सेवन केल्यास उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो.
2/8

वजन नियंत्रणात ठेवण्यास डाळिंब उपयुक्त आहे. डाळिंबात असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ देत नाहीत.
3/8

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डाळिंब फायदेशीर आहे.
4/8

तरुण राहायचे असेल तर डाळिंबाचा आहारात समावेश करा, हा एक अँटी-एजिंगचा उत्तम स्रोत आहे.
5/8

डाळिंबात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई देखील असतं जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
6/8

डाळिंब सांधेदुखीपासून बचाव करते, तसेच पचनक्रिया व्यवस्थित ठेवते.
7/8

गर्भवती महिलांसाठी डाळिंबाचे सेवन खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही. डाळिंबमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, फ्लोरिक अॅसिड हे गर्भवती महिलांच्या पोटात वाढणाऱ्या मुलांसाठी फायदेशीर मानले जाते.
8/8

ज्या पुरुषांना शारीरिक कमजोरी, थकवा आदी समस्या आहेत, त्यांच्यासाठी डाळिंबाचं सेवन फायदेशीर आहे. त्यामुळे पुरुषांनी रोज एक डाळिंब खावं.
Published at : 09 Jul 2023 07:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
