एक्स्प्लोर
Parenting Tips : वाढत्या वयात मुलांना चांगलं वळण लावायचंय? त्यासाठी प्रयत्न करताय? मग 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
मुलांचे चांगले संगोपन करायचे असेल, तर पालकांनी त्यांच्यासोबत अशा गोष्टी कधीही करू नये, ज्याचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Parenting Tips
1/10

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत मुलांचे चांगले आणि योग्य संगोपन करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांचे पालनपोषण योग्य पद्धतीने करणे हे देखील पालकांसमोर मोठे आव्हान आहे. लहान मुले जसजशी मोठी होत जातात तसतशी पालकांची जबाबदारी वाढत असते.
2/10

बर्याच वेळा लहान मुलांवर ओरडणे किंवा त्यांना लहानसहान गोष्टींसाठी शिव्या देणे ही तुमची सवय बनते. एखादी गोष्ट शिकवताना किंवा समजावून सांगताना त्याला आपुलकीने सांगणे गरजेचे आहे. तुम्ही जर मुलाला सतत शिव्या देत असाल रागवून बोलत असाल तर मुलाला प्रश्न विचारण्याची भीती वाटेल आणि तुम्ही त्याच्यावर ओरडल्याने त्याला राग येईल.
3/10

मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, यामुळे त्यांचे विचार आणि समज विकसित होण्यास मदत होते. ते त्यांच्या समस्या तुमच्याशी शेअर करतील आणि तुमच्या दोघांमधील बाँडिंगही चांगले राहील. तसेच त्यांना काही निर्णय स्वत:हून घेऊ द्यात.
4/10

कधी कधी असंही होतं की पालकांना मुलांच्या काही सवयी आवडत नाहीत. अशा स्थितीत त्यांना लगेच वाईट बोलू नका. तुमच्या मुलाला लगेच कोणत्याही गोष्टीचा दोष देऊ नका. तुम्ही कितीही रागावलात किंवा नाराज असलात तरी हे मुलांना त्याची जाणीव होणार नाही, याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.
5/10

प्रत्येक मुलाची स्वतःची खासियत असते. त्यामुळे तुमच्या मुलाची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका. सतत अशी तुलना केल्याने मुलातील आत्नविश्वास कमी होऊ शकतो. आपल्याला काहीच येत नाही अशी भावना त्यांना येत राहते.
6/10

काहीवेळा मुलांच्या इच्छा त्यांच्या मागण्यांपूर्वी पूर्ण केल्याने मुले हट्टी होतात. अनेक पालक असे असतात की मुलांनी काहीही मागितण्यापूर्वीच ते त्यांच्यासाठी वस्तू आणून देतात. अशा परिस्थितीत ही सवय मुलांवर नकारात्मक परिणाम करू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही एखादी वस्तू आणता तेव्हा लक्षात ठेवा की , खरेच आपल्या मुलाला या गोष्टीची गरज आहे का?
7/10

आजकाल मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात मुलं आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनमध्ये घालवू लागली आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या डोळ्यांवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यांच्या विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घाला आणि त्यांना मैदानात खेळण्यास प्रोत्साहित करा.
8/10

पालकांनी आपल्या मुलांना संयम बाळगणे आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्यास शिकवले पाहिजे. आजकाल लोकांमध्ये हे कमी आहे. हे गुण मुलामध्ये सुरुवातीपासूनच रुजवले तर तो भविष्यात खूप यशस्वी होऊ शकतो आणि या सवयी त्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासही मदत करतील.
9/10

हे स्पर्धेचे युग आहे, त्यामुळे मुलाला यश मिळावे म्हणून वेळोवेळी प्रोत्साहीत केले पाहीजे. त्याला अपयशाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यास देखील शिकवणे गरजेचे आहे. अपयशामुळे मुले बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.
10/10

अनेक वेळा मुलं हट्ट करतात तेव्हा आई-वडील मुलांना जे करायचं ते करू देतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा मुलांना प्रेमाने समजावून सांगितले पाहिजे. याद्वारे मुले योग्य आणि अयोग्य यातील फरक जाणून घेऊ शकतात.
Published at : 23 Sep 2023 01:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
