एक्स्प्लोर
In Pics : कुणाला 3 कोटींचे हिरे तर कुणाला सव्वा कोटींची कार! 'या' अभिनेत्रींना आपल्या पतीकडून मिळाली महागडी गिफ्ट

Bollywood News
1/6

कुणाला 3 कोटींचे हिरे तर कुणाला सव्वा कोटींची कार! अशी गिफ्ट मिळाल्यावर किती आनंद होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. मात्र अशी गिफ्ट बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींना त्यांच्या नवऱ्याकडून मिळाली आहे.
2/6

महागड्या भेटवस्तू दिल्यानंतर ही जोडपी चर्चेत देखील आली. गिफ्ट मिळालेल्या अभिनेत्रींमध्ये विद्या बालन ते शिल्पा शेट्टी अशा अभिनेत्रींचा समावेश आहे. अशा महागडे गिफ्ट मिळालेल्या अभिनेत्रींविषयी जाणून घेऊयात.
3/6

राणी मुखर्जी: अभिनेत्री राणी मुखर्जीनं निर्माता आदित्य चोपडासोबत लग्न केलं. आदित्यने राणी मुखर्जीला एक कार ऑडी ए8 डब्ल्यू 12 गिफ्ट केली होती. या कारची किंमत 1.25 कोटी रुपए आहे.
4/6

काजोल : मीडिया रिपोर्ट्सनुसार अजय देवगननं आपली पत्नी अभिनेत्री काजोलला मुलगी न्यासाचा जन्म झाल्यानंतर मर्सिडीज कार गिफ्ट केली होती. तसेच काजोल 34 वर्षांची झाल्यानंतर अजयनं तिला ऑडी क्यू 7 ही लग्जरी कार गिफ्ट केली होती.
5/6

विद्या बालन: अभिनेत्री विद्या बालनला तिचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूरनं एक आलिशान घर गिफ्ट केलं आहे. सिद्धार्थ आणि विद्या जुहूमधील सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहतात. हे अपार्टमेंट सिद्धार्थने विद्याला गिफ्ट केलं आहे. याची किंमक कोट्यवधीमध्ये आहे.
6/6

शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टीचे उद्योजक पती राज कुंद्रा देखील शिल्पाला महागडे गिफ्ट देत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार राजनं शिल्पाला जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफाच्या 19 मजल्यावर एक अपार्टमेंट गिफ्ट केलं आहे. सोबतच राज कुंद्रा यांनी शिल्पाला 3 कोटी रुपयांचा हिरा, निळ्या रंगाची लेंबोर्गिनी आणि बीएमडब्ल्यू झेड 4 कार देखील गिफ्ट केली आहे.
Published at : 13 Jul 2021 10:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
