येत्या काही महिन्यांत भारतात अनेक कार लाँच होणार आहेत. टाटा मोटर्स, ह्युंदाई, मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या ऑटोमोबाईल कंपन्या वेगवेगळ्या सेगमेंटमधील कार लाँच करतील.
2/5
येत्या काळात मारुती सुझुकी हॅचबॅक सेलेरियोचे अपग्रेडेड मॉडेल बाजारात आणणार आहे. ही मारुतीची नेक्स्ट जनरेशन कार असेल, जी उत्तम फिचर्स आणि लूकने सुसज्ज असेल. मारुतीने वॅगनआर आणि विटारा ब्रेझा कारचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केले आहेत.
3/5
Hyundai मायक्रो SUV सेगमेंटमध्ये Hyundai Casper लाँच करणार आहे. ह्युंदाई कॅस्पर शानदार लूक आणि पॉवरफूल फीचर्ससह सुसज्ज असेल. ही कार मारुती सुझुकी इग्निस आणि आगामी टाटा पंच सारख्या कारशी स्पर्धा करेल.
4/5
टाटा मोटर्स मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा पंच लाँच करणार आहे. टाटा मोटर्सने अलीकडेच पंचचा लूक समोर आणला होता. या कारचे फीचर्स येत्या काही दिवसात समोर येऊ शकतात. टाटा पंच मारुती इग्निस आणि महिंद्रा KUV100 आणि आगामी ह्युंदाई कॅस्पर यांच्याशी स्पर्धा करेल.
5/5
महिंद्रा अँड महिंद्रा नेक्स्ट जनरेशन ऑल न्यू महिंद्रा स्कॉर्पियो लॉन्च करणार आहे. ही कार नवी लूक आणि नव्या फीचर्सह सुसज्ज असेल.