Pakistan Flood : महापुराचा पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका, 18 अब्ज डॉलरचं नुकसान, आत्तापर्यंत 1 हजार 325 जणांचा मृत्यू
पुरामुळं पाकिस्तानचे 18 अब्ज डॉलरचं (18 USD billion) नुकसान झालं आहे. तसेच या पुरामुळं आत्तापर्यंत 1 हजार 325 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Pakistan Flood : पाकिस्तानात सध्या पुरानं थैमान (Pakistan Flood) घातलं आहे. यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झाल आहे. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. तसेच शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका (Financial Loss) देखील बसला आहे. या पुरामुळं पाकिस्तानचे 18 अब्ज डॉलरचं (18 USD billion) नुकसान झालं आहे. तसेच या पुरामुळं आत्तापर्यंत 1 हजार 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर साडेतीन कोटीहून अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे.
पाकिस्तानात आलेल्या महापुरामुळं कापूस, भात आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.पाण्याचा निचरा योग्य प्रकारे केला नाही तर गव्हाच्या पेरणीसाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. देशातील बहुतांश भागात कापूस पिक वाया गेलं आहे. तसेच आता गव्हाची पेरणी देखील धोक्यात आली आहे. या पुराचा पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसला आहे. 18 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. तसेच दरडोई उत्पन्नात देखील मोठी घट होण्याची शक्यता आहे.
गरिबी आणि बेरोजगारीचा दर वाढला
गरिबी आणि बेरोजगारीचा दर हा 21.9 टक्क्यांवरुन 36 टक्क्यांपर्यंत गेला आहे. यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास 118 जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. त्यामुलं 37 टक्के लोकसंख्येला फटका बसला आहे. देशभरातील लाखो लोकांची घर पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळं पडली आहेत. पायाभूत सुविधांचे नुकासान झाले आहे. शेतजमिनीबरोबरच पशुधनाचे देखील मोठं नुकसान झालं आहे. या भीषण पुरामुळे पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 1 हजार 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील धरणांवर प्रचंड दबाव असल्याने पूर पातळी वाढत आहे. त्यामुळं पुराचा धोका आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा 243 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
महागाईत मोठी वाढ
या पूर स्थितीची पाकिस्तानमध्ये मोठा परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात वस्तू महाग झाल्या आहेत. महागाईत मोठी वाढ झाली आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार वांग्याला दीडशे रुपये किलो, कांदा अडीचशे रुपये किलो आणि टोमॅटो शंभर रुपये किलोपर्यंत मिळत आहेत, तर कुठे 300 रुपये किलोने विकली जात आहेत. प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आहेत. काही दुकानदारही आपत्तीचा फायदा घेत महागड्या किंमतीत वस्तू विकत असल्याचा आरोपही केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Heavy Rain : यूपी बिहारसह उत्तराखंडमध्ये पूरस्थिती, तर पाकिस्तानात पुराचं थैमान, तर 1 हजार 200 जणांचा मृत्यू
- Pakistan Flood : महापुरामुळे पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली, 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू; पाकिस्तानच्या मंत्र्यांची माहिती