एक्स्प्लोर

Heavy Rain : यूपी बिहारसह उत्तराखंडमध्ये पूरस्थिती, तर पाकिस्तानात पुराचं थैमान, तर 1 हजार 200 जणांचा मृत्यू

देशातील बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक राज्यात पूरस्थिती  निर्माण झाली आहे. तर दुसरीकडं आपला शेजारी देश पाकिस्तानात देखील पुरानं थैमान घातल आहे.

Heavy Rain in India and Pakistan : सध्या देशातील काही राज्यात मुसळधार (Heavy Rain) पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशातील बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक राज्यात पूरस्थिती  निर्माण झाली आहे. तर दुसरीकडं आपला शेजारी देश पाकिस्तानात देखील पुरानं थैमान घातल आहे. पुरामुळं आत्तापर्यंत पाकिस्तानात 1 हजार 200 जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळं पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, बिहारमधील लोकांच्या अडचणी वाढल्या

बिहारमध्येही मुसळधार पावसामुळं नवं संकट ओढवलं आहे. गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं बिहारमधील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुसळधार पावसामुळे गंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्व घरे, रस्ते पाण्यात बुडाल्याची परिस्थिती आहे. लोक वाहतुकीसाठी बोटींचा वापर करत आहेत. मात्र सर्वांसाठी बोटींची व्यवस्था करणे हेही प्रशासनासमोरील मोठं आव्हान आहे. मुंगेरच्या कुतुलपूरच्या रस्त्यांवर तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. लोकांना पाण्यातून जावे लागत आहे. पाण्याची पातळी आणखी वाढली तर लोकांना घरात राहणं कठीण होणार आहे.

पाटण्यात गंगेचं उग्र रुप

बिहारची राजधानी पाटण्यात गंगेने उग्र रुप धारण केले आहे. येथील पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. राजधानीच्या मौजीपूर येथील नदी पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेली शेकडो वाहने गंगेच्या पुरात बुडाली आहेत. मुसळधार पुराच्या वेळी वाहने वाहून जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी वाहनांना दोरीने बांधले आहे.

उत्तराखंडच्या धारचुलामध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हरदिया नाल्यातील भरावामुळे इथं बांधलेला पूल देखील वाहून गेला आहे. त्यानंतर आजूबाजूचे लोक अडचणीत आले आहेत. तसेच कर्नाटक राज्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. तिथेही या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडं उत्तर प्रदेशमध्येही पावसानं कहर केला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

पाकिस्तानात पुराचा कहर 

पाकिस्तानात मुसळधार पावसानं कहर केला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पूर आला आहे. य पुरामुळं पाकिस्तानात खूप मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसत आहे. तर पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना वाचवण्यात येत आहे. पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात भीषण पुराचा सामना करत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget