पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या दौऱ्यावर, भारत आणि UAE मध्ये डिटिजल पेमेंटसह आठ करार
PM Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दौऱ्यावर आहेत. असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे बुधवारी अबुधाबी येथे आगमन झाले.
PM Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दौऱ्यावर आहेत. असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे बुधवारी अबुधाबी येथे आगमन झाले. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर भारत आणि यूएईमध्ये आठ सामंजस्य करार झाले. यूपीआय पेमेंट, वीज यासारख्या प्रमुख गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. या करारामुळे आर्थिक विकासाला आणखी चालना मिळेल, असे मोदींनी सांगितलं.
व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल पायाभूत सुविधा, फिनटेक, ऊर्जा, पायाभूत सुविधा, संस्कृती आणि लोकांमधील ऋणानुबंध यासह सर्व क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी वाढविण्याचे त्यांनी स्वागत केले. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. डिजिटल रुपे क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्टॅकवर आधारित संयुक्त अरब अमिरातीचे स्वदेशी कार्ड जेएवायडब्लूएएनचे उदघाटन केल्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे अभिनंदन केले.
भारत आणि यूएईमध्ये आठ करार :
द्विपक्षीय गुंतवणूक करार : हा करार उभय देशांमधील गुंतवणुकीला अधिक चालना देण्यासाठी एक प्रमुख सहाय्यक ठरेल. भारताने युएई सोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार आणि सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे.
विद्युत आंतरजोडणी आणि व्यापार क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार : यामुळे ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा व्यापारासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्याची नवीन कवाडे उघडली जातील.
भारत-मध्य पूर्व आर्थिक कॉरिडॉरवर भारत आणि युएई मधील आंतर-सरकारी आराखडा करार : या विषयावरील परस्पर सामंजस्य आणि सहकार्य यावर हा करार आधारित असेल आणि यामुळे भारत आणि युएई दरम्यानच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सहकार्याला प्रोत्साहन मिळेल.
डिजिटल पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील सहकार्याबाबत सामंजस्य करार : हे डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक सहकार्यासह विस्तृत सहकार्यासाठी एक चौकट तयार करेल आणि तांत्रिक ज्ञान, कौशल्ये आणि विशेषज्ज्ञांची देवाणघेवाण सुलभ करेल.
उभय देशांमधील राष्ट्रीय पुराभिलेखागार सहकार्य नियमावली : ही नियमावली पुरालेख सामग्रीची पुनर्स्थापना आणि जतन यांचा समावेश असलेल्या या क्षेत्रातील व्यापक द्विपक्षीय सहकार्याला आकार देईल.
वारसा आणि संग्रहालयांच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार : यामुळे गुजरातमधील लोथल येथील सागरी वारसा संकुलाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांमधील बांधिलकी वाढेल.
त्वरित पेमेंट प्लॅटफॉर्म – युपीआय (भारत) आणि एएएनआय (युएई) यांच्या परस्पर संलग्नतेबाबत करार : यामुळे दोन्ही देशांमधील अखंड सीमापार व्यवहार सुलभ होतील. हे गेल्या वर्षी जुलैमध्ये माननीय पंतप्रधानांच्या अबुधाबी भेटीदरम्यान इंटरलिंकिंग पेमेंट आणि मेसेजिंग सिस्टम्सच्या सामंजस्य कराराचे अनुसरण करते.
देशांतर्गत डेबिट/क्रेडिट कार्ड्स संलग्न करण्याबाबतचा करार – रुपे (भारत) सह जेएवायडब्लूएएन (युएई) : आर्थिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचे एक महत्त्वाचे पाऊल, यामुळे संयुक्त अरब अमिरातीतील रूपे ची सार्वत्रिक स्वीकृती वाढेल.
Had an excellent meeting with my brother HH @MohamedBinZayed. India-UAE friendship is growing stronger and stronger, greatly benefitting the people of our nations. pic.twitter.com/QTdYgrMN3o
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2024