एक्स्प्लोर

आगामी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही; जो बायडन यांची माघार, डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कोण असणार डेमोक्रॅट्सचा उमेदवार?

Joe Biden No to Presidential Election: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घोषणेपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत रंजक वळण पाहायला मिळत आहे.

Joe Biden No to Presidential Election: अमेरिकेच्या निवडणुका (US Elections) तोंडावर आल्या असून सध्या जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर भर सभेत हल्ला करण्यात आला. तेव्हापासूनच अमेरिकेचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या एका घोषणेनं प्रचंड खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी एक मोठी घोषणा केली. त्यांनी 2024 मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपलं नाव मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता दावेदार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. बायडन यांच्यानंतर कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष पदासाठी पुढील दावेदार असतील. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील नेतेमंडळीच बायडन यांच्यावर दबाव आणत असल्याचं बोललं जात होतं. त्याचवेळी जो बायडन यांनी हा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेच्या राजकारणत प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. जो बायडन यांच्या सहकाऱ्यांनीच आगामी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ते कमकुवत उमेदवार असल्याचं सांगितलं होतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घोषणेपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत रंजक वळण पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आगामी अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ते लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. स्वतः पत्र लिहून त्यांना हा निर्णय जाहीर केल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच बायडन पुढील आठवड्यात देशाला संबोधित करणार आहेत.

आधीपासूनचं आलेलं चर्चांना उधाण 

जो बायडन राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार की, नाही यावर बराच काळ चर्चा सुरू होती. प्रकृतीच्या कारणास्तव ते कदाचित राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार नसल्याच्या त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या समस्यांबद्दलही चर्चा होती आणि रविवारी या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाच. स्वतः बायडन यांनी मोठी घोषणा केली.

लाईव्ह डिबेटमध्ये अनेकदा फ्रीज झालेले बायडन 

बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. लाईव्ह डिबेटमध्येही अनेकदा बायडन यांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. लाईव्ह डिबेटमध्ये ट्रम्प यांच्यासमोर निशब्द झाले होते. निवडणुकीपूर्वी, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षांचे उमेदवार जो बायडन यांच्यात सर्वात आधी डिबेट झाली होती. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचाच वरचष्मा पाहायला मिळाला होता. अशा परिस्थितीत बायडन यांनी या शर्यतीतून माघार घ्यावी, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. 

माघार घेणार नाही; बायडन यांच्या टीमनं स्पष्ट केलेलं 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या डिबेटनंतर न्यूयॉर्क टाईम्सनं आपल्या एडिटोरियलमध्ये म्हटलं होतं की, आपल्या देशाची सेवा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरुन माघार घ्यावी. यानंतर एका वर्गानं बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावं, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, बायडन आणि त्यांच्या प्रचार समितीनं त्यावेळी म्हटलं होतं की, आम्ही हार मानणार नाही आणि शर्यतीतून माघार घेणार नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
Eknath Shinde महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBalasaheb Thorat On Sanjay Gaikwad  : Rahul Gandhi यांच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद नाहीTop 25 news : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  2PM :  16 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
Eknath Shinde महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Sujay Vikhe Patil : 'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
Amin Patel Meets Fadnavis: मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
Embed widget