एक्स्प्लोर

new india cooperative bank: मॅनेजरवर दबाव टाकून भाजपवाल्यांना कर्जे द्यायला लावली, स्वत:ची जागा भाड्याने देऊन लाखो कमावले? 'त्या' आरोपांवर राम कदमांचं स्पष्टीकरण

new india cooperative bank: न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या मॅनेजरवर दबाव टाकून कर्ज द्यायला लावले, गंभीर आरोपांवर भाजप आमदार राम कदमांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

मुंबई: मुंबईतील अनेक सामान्य माणसांचे पैसे अडकून पडलेल्या न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात भाजप आमदार राम कदम यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आला होता. राम कदम (MLA Ram Kadam) यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहता याच्यावर दबाव टाकून त्याला नियमबाह्य पद्धतीने कर्ज द्यायला भाग पाडले. ही कर्जे भाजपशी संबंधित असलेल्या लोकांना देण्यात आली. या कर्जांची कधीही परतफेड करण्यात आली नाही. तसेच राम कदम यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या (new india cooperative bank) शाखांसाठी स्वत:च्या मालकीचे चेंबूर, घाटकोपर आणि मुंबई उपनगरातील गाळे अव्वाच्या सव्वा दराने भाड्याने दिले. या सगळ्यामुळे बँक डबघाईला आली, असा आरोप झाला होता. या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना आमदार राम कदम यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

माझ्याबाबत वक्तव्य करताना जबाबदारीने बोला, अन्यथा कारवाईला तयार राहा. न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये अनेक खातेदारांचे पैसे अडकले आहेत. या बँकेचा मी सुद्धा एक खातेदार असून त्यामुळे माझे सुद्धा पैसे याच बँकेत अडकले आहेत. माझ्यासह माझ्या कुटुंबातीलही काही जणांचे खाते याच बँकेत आहे. त्यांचेही पैसे बँकेत अडकले आहेत. या परिस्थितीत, मी या प्रकरणातील पीडित व्यक्ती आहे, याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणामध्ये, माझ्यासह प्रत्येक खातेदाराला त्यांनी बँकेत ठेवलेला पैसा परत मिळावा यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्नशील असल्याचे राम कदम यांनी सांगितले.

कोणतीही सत्यता पडताळून न पाहता माझ्याविरोधात काहीजणांनी विनाकारण बडबड सुरू केली आहे. यावर, आधारित बातम्या सुद्धा प्रसिद्ध होतील असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, या घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही आणि उलट फसलेल्या हजारो लोकांना मदत करण्याची माझी भूमिका नेहमी आहे आणि भविष्यातही राहील. तरीसुद्धा विनाकारण या घोटाळ्याशी माझे नाव जोडले गेल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरणार नाही.  न्यू इंडिया सहकारी बँकेच्या घोटाळ्याशी माझे नाव जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात मी कायदेशीर कारवाई सुरू करत आहे. तरी कृपया " असत्य "  बातम्या  आणि तशी वक्तव्य सुद्धा करताना वरील बाब लक्षात असू द्यावी. माझी सरकारकडे आग्रही मागणी आहे की  सर्व पीडितांना न्याय मिळावा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक पेक्षा अति कडक कारवाई व्हावी, असे राम कदम यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे.

बँकेच्या मॅनेजरने ठेवीदारांचे पैसे व्यापाऱ्यांना व्याजाने उसने दिले, हितेश मेहताची पोलिसांकडे कबुली

न्यू इंडिया सहकारी बॅक गैरव्यवहार प्रकरणात आरोपी हितेश मेहता हा लोकांनी ठेवीसाठी दिलेले पैसे परस्पर व्याजाने देत असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. कोविड काळात अनेक व्यावसायिकांच्या व्यवसायाला खीळ बसली होती. व्यवसायात प्रचंड नुकसान झाल्या व्यावसायिकांना पैशांची नितांत गरज असल्याचे पाहून हितेशने बॅकेतील ठेवीदारांचे पैसे व्याजाने देऊ पैस कमवण्याचा गोरखधंदाच सुरू केला होता.

या गैरव्यवहारात हितेशसह आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धर्मेश पौन यालाही अटक केली आहे. धर्मेश हा बांधकाम व्यावसायिक असून त्याचा प्रकल्प चारकोप येथे सुरू आहे. हितेशने धर्मेशला व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी रुपये दिल्याचे कबूल केले आहे.काही वर्षापूर्वी हितेशने धर्मेशकडून एक फ्लॅट विकत घेतला होता. त्यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली होती. कालांतराने धर्मेशकडून घेतलेला फ्लॅट विकला. तर तपासात या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला उन्ननाथन अरुणाचलम उर्फ ​​अरुण भाई नावाच्या व्यक्तीचा सहभागही निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही आरोपी केले आहे

अरुण हा व्यवसायाने इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहे. धर्मेशप्रमाणेच हितेशने अरूणलाही त्याच्या व्यवसासाठी व्याजाने 40 कोटी रुपये दिले होते. EOW च्या तपासात अशाच प्रकारे हितेशने अनेकांना बॅकेतल्या ठेवींचे पैसे हे व्याजाने देऊन बक्कळ पैसे कमवल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, व्याजाने दिलेल्या पैशातून धर्मेशला किती नफा झाला याचा पोलिस तपास करत आहेत.

हितेश हा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे आणि त्याने 1987 मध्ये या बँकेत काम करण्यास सुरुवात केली होती. हितेश यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होता. 2022 मध्ये त्यांची जनरल मॅनेजर आणि हेड अकाउंटंट म्हणून नियुक्ती झाली. हितेशने प्रभादेवी कार्यालयातील तिजोरीतून 112 कोटी रुपये, तर गोरेगाव कार्यालयातील तिजोरीतून 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी वाचा

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा! मॅनेजर हितेश मेहताला अटक, 122 कोटीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
Embed widget