Shinzo Abe : जपान मिलिट्रीत काम केलेल्या व्यक्तीनं मारल्या शिंजो आबे यांना गोळ्या; जाणून घ्या हल्लेखोराबाबत महत्वाच्या 5 गोष्टी
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Japan Ex-Prime Minister Shinzo Abe) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दरम्यान हल्लेखोराला पकडलं आहे. हल्लेखोरासंदर्भातील महत्वाच्या पाच गोष्टी
Former Japanese PM Shinzo Abe Shot: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Japan Ex-Prime Minister Shinzo Abe) यांच्यावर पश्चिम जपानमधील नारा येथे गोळ्या झाडण्यात आल्या. शहरात भाषण करताना माजी पंतप्रधानांना गोळी मारल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता (भारतीय वेळेनुसार 8.29 वाजता) घडली. पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे की, 67 वर्षीय अबे जपानच्या नारा शहरातील रस्त्यावर भाषण देत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
शिंजो आबे यांच्यावर खूप जवळून गोळी झाडण्यात आली. शिंजो आबे यांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोराला पकडण्यात यश आलं असून त्याचं नाव तेत्सुया यमगमी असं आहे.
हल्लेखोरासंदर्भातील महत्वाच्या पाच गोष्टी
1-शिंजो आबे यांच्यावर हल्ला करणारा शूटर तेत्सुया यमगमी स्थानिक व्यक्ती आहे.
2-रिपोर्ट्सनुसार 41 वर्षीय शूटर तेत्सुया यमगमी हा जपानच्या मिलिट्रीमध्ये होता. त्यानं जपानच्या नौदलात सेवा बजावली आहे.
3- तेत्सुया यमगमीनं ज्यावेळी शिंजे ओबे यांच्यावर फायरिंग केली त्यावेळी त्या दोघांमधील अंतर केवळ 10 फुटांचं होतं.
4-शिंजो आबे यांना गोळी लागल्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी लगेच तेत्सुया यमगमीला पकडलं.
5-रिपोट्सनुसार तेत्सुया यमगमीनं शॉटगनचा वापर केला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान
शिंजो आबे यांच्या वडिलांचे 1993 मध्ये निधन झाले, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली. यानंतर शिंजो आबे यांची लोकप्रियता वाढतच गेली. 2006 मध्ये, लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते शिंजो आबे यांची वयाच्या 52 व्या वर्षी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याशिवाय शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले होते.
प्रकृती अस्वस्थतेमुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला
67 वर्षीय शिंजो आबे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ते सलग 7 वर्षे सहा महिने जपानचे पंतप्रधान राहिले. पण आतड्याच्या आजारामुळे शिंजो आबे यांना 2014 साली पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
जपानचे प्रधानमंत्री फुमिया किशिदा घटनेनंतर भावूक
जपानचे प्रधानमंत्री फुमिया किशिदा घटनेनंतर भावूक झाले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, हा हल्ला दुर्देवी हल्ला आहे. हल्लेखोराला कडक शिक्षा केली जाईल. आबे यांनी प्रकृती खूप चिंताजनक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.