Trending News : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भर रस्त्यात गोळीबार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Trending News : जपानमध्ये भाषण करताना शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Trending News : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Japan Ex-Prime Minister Shinzo Abe) यांच्यावर पश्चिम जपानमधील नारा येथे गोळ्या झाडण्यात आल्या. शहरात भाषण करताना माजी पंतप्रधानांना गोळी मारल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता (भारतीय वेळेनुसार 8.29 वाजता) घडली. अहवालात म्हटले आहे की, 67 वर्षीय अबे जपानच्या नारा शहरातील रस्त्यावर भाषण देत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
जापान के पूर्व प्रधानमंत्री शिंजो आबे को नारा शहर में भाषण के दौरान पीछे से हमलावर ने गोली मारी... गोली लगने के बाद शिंजो आबे वहीं गिर पड़े, इसके बाद उन्हें फौरन अस्पताल ले जाया गया.
— राजेश कुमार/Rajesh Kumar (@rajeshemmc) July 8, 2022
यहां पढ़ें पूरी खबर-https://t.co/jcXngMYiBx #shinzoAbe pic.twitter.com/w0dQTAiecI
सलग दोन स्फोटांचे आवाज
जपानी वृत्तसंस्था एनएचकेने शुक्रवारी वृत्त दिले की, घटनास्थळी गोळ्यांचा आवाज ऐकू आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एनएचकेच्या पत्रकाराने सांगितले की, आबे यांच्या भाषणादरम्यान त्यांनी सलग दोन स्फोट ऐकले.
संशयित ताब्यात
जपान येथील मीडिया हाऊस NHK ने वृत्त दिले की, शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी पश्चिम जपानमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबार करणाऱ्या एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. आणखी एक जपानी मीडिया हाऊस क्योडोने म्हटले की, आबे हे अद्यापही शुद्धीवर आलेले नाहीत, ते अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहेत
आबे आणि भारताचे संबंध
राजकीय घराण्यातील आबे अनेकदा चर्चेत असत. ते जपानमध्ये दीर्घ काळ पंतप्रधान राहिले पण त्यांच्या आजारामुळे त्यांनी राजीनामा दिला. जपानचे पंतप्रधान म्हणून त्यांनी 2006, 2014, 2015 आणि 2017 मध्ये भारताला भेट दिली आणि भारताशी जवळचे संबंध प्रस्थापित केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :