(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shinzo Abe : कोण आहेत शिंजो आबे? स्टील प्लांटमध्ये नोकरी ते देशाचे पंतप्रधान; जबरदस्त जीवनप्रवास!
Who Is Shinzo Abe : शिंजो आबे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
Who Is Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण देताना गोळी लागली. शिंजो आबे यांच्यावर हा प्राणघातक हल्ला जपानच्या नारा शहरात झाला असून त्यांना दोन गोळ्या लागल्या, त्यानंतर ते जमिनीवर पडले. गोळी लागल्याने शिंजो आबे यांनाही हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. कोण आहेत जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे? जाणून घ्या त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी.
राजकीय घराण्याशी संबंध
शिंजो आबे जपानचा जन्म 21 सप्टेंबर 1954 रोजी टोकियो येथे झाला. ते जपानच्या प्रभावशाली राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे आजोबा कैना आबे आणि वडील सिंतारो आबे हे जपानचे खूप लोकप्रिय नेते होते. त्याच वेळी त्यांचे आजोबा नोबोसुके किशी जपानचे पंतप्रधान होते. निओसाका येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सायकी विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी पूर्ण केली. त्यानंतर शिंजो आबे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला गेले. जिथे त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
राजकारणात येण्यापूर्वी स्टील प्लांटमध्ये केले काम
शिंजो आबे यांनी राजकारणात येण्यापूर्वी दोन वर्षे कोबे स्टील प्लांटमध्ये काम केले. अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून परतलेल्या शिंजो आबे यांनी दोन वर्षे काबे स्टील प्लांटमध्ये काम केले. स्टील प्लांटमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला.
सर्वात तरुण पंतप्रधान
शिंजो आबे यांच्या वडिलांचे 1993 मध्ये निधन झाले, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली. यानंतर शिंजो आबे यांची लोकप्रियता वाढतच गेली. 2006 मध्ये, लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते शिंजो आबे यांची वयाच्या 52 व्या वर्षी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याशिवाय शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले होते.
प्रकृती अस्वस्थतेमुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला
67 वर्षीय शिंजो आबे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ते सलग 7 वर्षे सहा महिने जपानचे पंतप्रधान राहिले. पण आतड्याच्या आजारामुळे शिंजो आबे यांना 2014 साली पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
संबंधित बातमी
Trending News : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भर रस्त्यात गोळीबार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल