International Tiger Day 2022 : आज जागतिक व्याघ्र दिन; का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या
International Tiger Day 2022 : वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे.

International Tiger Day 2022 : जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day) दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. दरवर्षी 29 जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा केला जातो.
Today is #InternationalTigerDay .
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 29, 2022
Wild #tiger population in #India;
2006: 1411 tigers
2010: 1706 tigers
2014: 2226 tigers
2018: 2967 tigers
Today #India is home to 70% wild tigers of the world. We save tigers to save habitat.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा अहवालानुसार, 2017 पासून महाराष्ट्रात 134 वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, 2022 सालात 17 वाघांच्या मृत्यूची नोंद तर 2021 सालात 40 वाघांचा मृत्यू झाला आहे. 2012 ते 2020 सालात महाराष्ट्रात 141 वाघांचा मृत्यू झाला आहे. देशात 2022 सालात आतापर्यंत 75 वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 2017 साली 21 मृत्यू, 2018 साली 22, 2019 साली 18, 2020 साली 16, 2021 साली 40 तर जुलै 2022 पर्यंत 17 वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. तर, देशात एकूण तीन हजारांहून अधिक वाघांची संख्या आहे.
वाघांचे प्रकार किती?
जसे पांढरे वाघ, पांढरे काळे पट्टे असलेले तपकिरी वाघ, काळे पट्टे असलेले तपकिरी वाघ असे विविध रंगांचे वाघ आहेत. आतापर्यंत जवळपास बाली वाघ, कॅस्पियन टायगर, जावन टायगर आणि टायगर हायब्रीड या प्रजाती नामशेष झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
