एक्स्प्लोर
Coronavirus | अमेरिकेमध्ये एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद; 5 दिवसांत 8713 लोकांनी गमावला जीव
कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल होताना दिसत आहे. जगभरात आतापर्यंत 15 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 88 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या सतत वेगाने वाढत आहेत. जगभरातील सर्व देशांपैकी सर्वाधिक कोरोना बाधित अमेरिकमध्ये आहेत. सध्या अमेरिकेमध्ये 4 लाख 34 हजार 927 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 31 हजार 935 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेमध्ये आतापर्यंत 14,788 लोकांचा मृत्यू
अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत अमेरिकेत 14 हजार 788 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 1940 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये एका दिवसात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या आकड्यात वाढ
अमेरिकेमध्य एकूण 4 लाख 34 हजार 927 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3 लाख 97 हजार 248 रूग्ण आहेत. अमेरिकेमध्ये एकूण 279 रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर 22 हजार 891 लोक उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत.
पाहा व्हिडीओ : लॉकडाऊनमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येणं शक्य, हॉटस्पॉटच्या परिसरात अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवले : आरोग्य मंत्रालय
3 एप्रिल रोजी मृतांचा आकडा 6075 होता
3 एप्रिलपर्यंत कोरोनामुळे अमेरिकेत 6075 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आज 9 एप्रिल रोजी यूएसएमध्ये मृतांचा आकडा 14 हजारा 788 वर पोहोचला आहे. अशाप्रकारने मीगल 5 दिवसांत अमेरिकेत 8000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 5 दिवसांत अमेरिकेत 8713 लोकांनी या जीवघेण्या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे.
न्यूयॉर्कमध्ये एक दिवसात सर्वाधिक मृत्यू
अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे एकाच दिवसात 779 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा एका दिवसांतील झालेल्या मृत्यूंचा सर्वात मोठा आकडा आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्र्यू कुओमो यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 'मृतांचा आकडा अजुन वाढू शकतो. कुओमो यांनी सांगितले की, 9/11च्या आतंकवादी हल्ल्यानंतर 2753 लोकांचा मृत्यू झाला होता. तर कोरोना व्हायरसमुळे न्यूयॉर्कमध्ये 6268 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये कोरोना व्हायरसमुळे 731 लोकांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | जगभरातील मृतांचा आकडा 88 हजार पार; तर कोरोना बाधितांची संख्या 15 लाखांहून अधिक
अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू
Coronavirus | हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर ट्रम्प यांचा सूर बदलला; पंतप्रधान मोदींचे आभार मानले!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
