एक्स्प्लोर

Coronavirus | जगभरातील मृतांचा आकडा 88 हजार पार; तर कोरोना बाधितांची संख्या 15 लाखांहून अधिक

कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल होताना दिसत आहे. जगभरात आतापर्यंत 15 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 88 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या महाभयंकर व्हायरसमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जगभरात 88 हजारांहून अधिक लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांच्या पार गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे सहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर नव्याने 78 हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं ससोर आलं आहे.

कोरोना व्हायरसचं नवं केंद्र अमेरिका झाल्याचं दिसून येत आहे. जगभरात कोरोमाचा प्रादुर्भाव अमेरिकेत दिसून येत आहेत. अमेरिकेतील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 4 लाखांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत येथे 4,27,101 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत आहे. येथे 4,27,101 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांत 1800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हाच मृतांचा आकडा वाढत 14 हजार पार गेला आहे.

अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना बाधित स्पेनमध्ये आहेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 1,48,220 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा 14,792 वर पोहोचला आहे. स्पेननंतर इटलीमध्येही कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा अधिक आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 1,39,422 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 17,669 लोकांचा मृत्यु झाला आहे.

VIDEO | Coronavirus | ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक घालू नका; पंतप्रधान मोदी आणि संजय राऊत यांच्यात चर्चा

फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये देखील कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळतो आहे. जर्मनीमध्ये आतापर्यंत 1,13,296 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2,349 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये 1,12,950 लोकांना या जीवघेण्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्गामुळे आतापर्यंत फ्रान्समध्ये 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 60,733 लोकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 7,097 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या 4263 वर पोहोचली आहे. तिथे 61 लोकांचा मृत्यू झाला आहे.

या देशांव्यतिरिक्त इराण, ब्रिटन, आणि कॅनडा या देशांमध्येही कोरोनाने तीव्र प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. तर चीनमधील ज्या वुहान प्रांतात कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती. तिथे मंगळवारी या व्हायरसमुळे एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही. तेथील लॉकडाऊन देखील हटवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

इटलीमध्ये जहाजावर अडकले 224 भारतीय; 13 जणांना कोरोनाची लागण तर 34 संशयित

Coronavirus | हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर ट्रम्प यांचा सूर बदलला; पंतप्रधान मोदींचे आभार मानले!

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध न दिल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget