Nandurbar Crime : शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
Nandurbar Crime : नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात शेतीचा जुना वाद टोकाला गेला. कुऱ्हाडीने सपासप वार करत एका मजुराला संपवण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Nandurbar Crime : नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. धडगाव तालुक्यातील (Dhadgaon Taluka) बिललगाव गावात जुन्या घटनेचा वाद टोकाला गेला आहे. एका मजुराची कुऱ्हाडीने वार हत्या करण्यात आली आहे. फाड्या खाज्या पावरा (40) असे मृत इसमाचे नाव असून या हत्याकांडामुळे नंदुरबार हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबारचा मजुर पंढपुरात गेला होता. तो धडगाव तालुक्यातील बिललगाव या आपल्या मूळ गावात परतला. यानंतर तो नदीवर आंघोळीला जात असताना पूर्वीच्या शेतीच्या वादातून संतप्त झालेल्या गावातील काही जणांनी फाड्या पावरा याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
मजुराची कुऱ्हाडीने वार करत हत्या
यानंतर फाड्या पावरा याच्यावर धारदार कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. मजुराचा मृतदेह नदीजवळ पडून होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तपास करत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मजुराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
शहादा तालुक्यात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या
दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शाळेच्या इमारतीचे काम सुरु असल्याने सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रमशाळेच्या आवारातच भरत होती. याठिकाणी मुलीच्या वसतीगृहातीलखोलीत मुलीने आत्महत्या केली आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शाळा व्यवस्थापनावर विविध आरोप करत संबंधितांवर कारवाई करत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा उचलला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या



















