एक्स्प्लोर

Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एकूण सात जणांविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तर इतर तीन आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.   

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की,  28 फेब्रुवारीला घडलेल्या कोथळे गावातील घटनेबाबत काल दि. 2 मार्च रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनिकेत भोई, किरण माळी, अनुज पाटील अशी त्यांची नावे आहेत. 

एक आरोपी अल्पवयीन

तर आणखीन एक चौथा आरोपी अल्पवयीन आहे. त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. एसआयआरमध्ये एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्वरित तीन आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. या प्रकरणात अनिकेत भोई हा मुख्य आरोपी आहे. त्याच्या विरोधात याआधी चार गुन्हे दाखल आहेत. चारही गुन्ह्याचे स्वरूप मारहाण, हाणामारी असे आहे. तर इतर आरोपींविरोधात याआधी कुठले गुन्हे दाखल असल्याची माहिती आतापर्यंत आम्हाला मिळालेली नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या होत्या. यानंतर या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) सात पैकी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अनुज पाटील, अनिकेत भोई, किरण माळी, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टवाळखोरांची नावे आहेत. 

आणखी वाचा 

Raksha Khadse : लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

Embed widget