Champions Trophy 2025: गंभीर बोलला, रोहितने हट्ट केला; नहीं नहीं नहीं बोलत जय शाहांचा हात पकडून उड्या मारल्या, VIDEO
Rohit Sharma Jay Shah Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात जोरदार सेलीब्रेशन केले.

Rohit Sharma Jay Shah Champions Trophy 2025: भारतीय संघाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. काल (9 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करत भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात नऊ महिन्यांत भारताचे हे दुसरे आयसीसी जेतेपद आहे. 29 जून 2024 ला भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात जोरदार सेलीब्रेशन केले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने (Rohit Sharma And Virat Kohli) तर चक्क स्टम्प हातात घेत भर मैदानात दांडिया खेळला. याचदरम्यान रोहित शर्मा, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित शर्मा जय शाह यांच्याकडे काहीतरी हट्ट करत असल्याचे दिसत आहे.
गंभीर बोलला, रोहितने हट्ट केला; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी रोहित शर्मा आणि गौतम गंभीरची भेट घेत अभिनंदन आणि कौतुक केले. यानंतर रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि जय शाह मैदानात गप्पा मारत होते. यावेळी गौतम गंभीर काहीतरी रोहित शर्माला बोलला आणि तिघंही नंतर हसू लागले. यानंतर रोहित शर्माने नहीं, नहीं, नहीं म्हणत जय शाह यांचा हात पकडला आणि उड्या मारत नाचू लागला. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.
BC Rohit making Jay Shah to Dance 😭🤣 pic.twitter.com/XKylOiBZ1S
— ADARSH (@Adarshdvn45) March 9, 2025
मी वनडेतून निवृत्त होणार नाही- रोहित शर्मा
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा तसा निर्णय घेऊ शकतो अशा अफवांना चर्चा आलं होतं. मात्र, पत्रकार परिषद संपवताना रोहितनं निवृत्तीवर मोठं भाष्य केलं. रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्धची मॅच जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. यानंतर रोहितनं पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. पत्रकार परिषद संपवताना रोहित शर्मानं निवृत्तीबाबत आवर्जून भाष्य केलं. अजून एक गोष्ट सांगतो, मी वनडेतून निवृत्त होणार नाही, अफवांना हवा देऊ नका, असं रोहित म्हणाला.




















