Success Story : कष्टाचं चीज झालं! डिलिव्हरी बॉयचं काम करता करता तो बनला सरकारी अधिकारी; कौतुक करण्यासाठी ‘Zomato’चं खास ट्विट
विघ्नेश मूळचा तामिळनाडूचा आहे. झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. विघ्नेश नुकतंच तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला आहे. झोमॅटोने आपल्या ट्विटर हँडलवर विघ्नेशची कहाणी शेअर केली.
![Success Story : कष्टाचं चीज झालं! डिलिव्हरी बॉयचं काम करता करता तो बनला सरकारी अधिकारी; कौतुक करण्यासाठी ‘Zomato’चं खास ट्विट Zomato Delivery Boy Clears Tamilnadu Public Service Commission Exam Zomato Drops Post Know In Detail News Marathi Success Story : कष्टाचं चीज झालं! डिलिव्हरी बॉयचं काम करता करता तो बनला सरकारी अधिकारी; कौतुक करण्यासाठी ‘Zomato’चं खास ट्विट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/6c28db67318b546d8c1b4109ed0ac3f31690371115136766_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Trending News : शासकीय सेवेत रुजू होत देशसेवा करण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असतं. स्वप्न साकार करण्यासाठी तरुण कठोर परिश्रम घेतात, दिवसरात्र एक करून मेहनत घेतात. आज अशीच अनोखी कथा आम्ही तुमच्याकरता घेऊन आलो आहोत. ज्याची कहाणी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय विघ्नेशने तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विघ्नेश हा तामिळनाडूचा रहिवासी आहे. अलीकडेच फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने त्यांच्या ट्विटर हँडलवर तामिळनाडूतील विघ्नेशची कहाणी शेअर केली आहे. कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने राज्यातील अत्यंत अवघड परीक्षा देऊन अधिकारी पदं मिळवल्याचे कंपनीने सांगितले आहे.
झोमॅटोने त्याची कथा शेअर केली आणि लिहिले, "डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करताना अलीकडेच तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विघ्नेशसाठी एक लाईक करा." विघ्नेशची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विघ्नेशची कहाणी लाखोंच्या घरा-घरात पोहोचली आहे. त्याच्या या यशाबद्दल सोशल मीडिया यूजर्सकडून त्याचे अभिनंदन होत आहे. कित्येक अडचणींवर मात करत हा पठ्ठ्या तामिळनाडू लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत उत्तीर्ण झाला आहे.
Zomato ने केले ट्विट
Zomato डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करताना तमिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विघ्नेशसाठी Zomato ने एक ट्विट केले आहे. त्या ट्विटखाली लिहिले आहे, "एक लाईक विघ्नेशकरता. Zomato डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करताना तो मोठ्या जिद्दीने तमिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला आहे."
drop a like for Vignesh, who just cleared Tamil Nadu Public Service Commission Exam while working as a Zomato delivery partner ❤️ pic.twitter.com/G9jYTokgR5
— zomato (@zomato) July 24, 2023
ही पोस्ट आतापर्यंत 70 हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. या पोस्टला तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावर 50 हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. या पोस्टवर लोक विघ्नेशचे जोरदार अभिनंदन करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, "वाह! अभिनंदन विघ्नेश." वापरकर्ते लिहित आहेत की, "कठोर परिश्रम आणि समर्पणाने सर्वकाही शक्य आहे. विघ्नेशच्याने केलेल्या कष्टास सलाम." त्याचवेळी "विघ्नेश डिलिव्हरी बॉयची नोकरी कधी सोडतोय, "असा प्रश्न काही युजर्स गमतीने विचारत आहेत.
तामिळनाडू लोकसेवा आयोग
तामिळनाडू लोकसेवा आयोग परीक्षा ही TNPSC द्वारे आयोजित राज्यस्तरीय नागरी सेवा परीक्षा आहे. TNPSC ने 12 जुलै रोजी एकत्रित नागरी सेवा परीक्षा गट 4 चा निकाल जाहीर केला होता. ही परीक्षा ग्राम प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, बिल कलेक्टर ग्रेड-1, बिल कलेक्टर, फील्ड असिस्टंट आणि स्टोअर कीपर यांसारख्या विविध पदे भरण्यासाठी घेतली जाते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)