Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
भिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला आहे. वांद्रे (Bandra) इथल्या राहत्या घरी चाकूहल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घरात शिरलेल्या चोरानं सैफ अली खानवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. रात्रीच्या वेळी एका अज्ञात व्यक्तीनं सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सैफला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफवर उपचार सुरू असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर काल रात्री मध्यरात्री चाकू हल्ला झाला. अज्ञाता व्यक्तीनं चाकू हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या व्यक्तीनं तब्बल दोन ते तीनवेळा सैफवर वार केल्याची माहिती मिळत आहे. चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या व्यक्तीनं दोन ते तीनवेळा वार केल्याची माहिती मिळत आहे.