Zomato: 'लगान'मधील 'कचरा' व्यक्तिरेखेचा जाहिरातीत वापर केल्याने झोमॅटो वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नीरज यांची सडकून टीका
झोमॅटोच्या (Zomato) जाहिरातीमध्ये लगान चित्रपटातील कचरा ही भूमिका साकारणारे अभिनेते आदित्य लखिया (Aditya Lakhia) यांनी काम केले आहे.
Zomato: झोमॅटो (Zomato) या फूड डिलिव्हरी अॅपचा वापर अनेक जण करतात. झोमॅटोच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या अॅपच्या प्रमोशनसाठी अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. काही दिवसांपूर्वी झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपनं प्लास्टिकचा पुनर्वापर आणि पर्यावरणाला कचरा आणि प्रदूषणापासून मुक्त करण्याचा संदेश लोकांना देण्यासाठी एक जाहिरात तयार केली. या जाहिरातीमध्ये 'लगान' (Lagaan) चित्रपटातील 'कचरा' या व्यक्तिरेखेचा वापर करण्यात आला. या जाहिरातीमध्ये लगान चित्रपटातील कचरा ही भूमिका साकारणारे अभिनेते आदित्य लखिया (Aditya Lakhia) यांनी काम केले आहे. आता या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. 'मसान' चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज यांनी एक ट्वीट शेअर करुन झोमॅटोच्या या जाहिरातीवर टीका केली आहे.
नीरज यांचे ट्वीट
नीरज यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'लगान चित्रपटामधील कचरा ही व्यक्तीरेखा दलितांचे केलेले सर्वात अमानुष चित्रण होते. झोमॅटोनं या जाहिरातीमध्ये त्याचाच वापर केला आहे आणि एक जातिवादी जाहिरात बनवली आहे. हे, अत्यंत असंवेदनशील आहे!'
#Kachra from #Lagaan was one of the most dehumanised voiceless depictions of Dalits ever in cinema. @zomato has used the same character and made a repulsive #casteist commercial. A human stool? Are you serious? Extremely insensitive! https://t.co/xWUpDatUvD
— Neeraj Ghaywan (@ghaywan) June 8, 2023
अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन झोमॅटोच्या या जाहिरातीचा निषेध केला आहे. 'झोमॅटोनं जाहिरात करण्यासाठी ही जातीयवादी कल्पना वापरली आहे आणि या जाहिरातीच्या माध्यमातून “कचरा” या उपेक्षित पात्राचा अपमान करण्यात आला आहे' असं ट्वीट करुन एका नेटकऱ्यानं झोमॅटो अॅपच्या या जाहिरातीचा निषेध व्यक्त केला आहे.
Casteist idea by Zomato to make an advertisement and humiliate a marginalised character “Kachra”. pic.twitter.com/nrXB2UF60R
— Harsh (@_ambedkarite) June 6, 2023
Im deleting the app! @zomato NEVER USING Y’all for filling my stomach. The people who insult Dalits and other “backward” castes. Fyou honestly
— Saee| ✨ (@ineedblankspace) June 8, 2023
Remove the ad while you can! Be sensitive in the retrospect at least! You are losing customers anyways.
I urge my moots to delete it too
I wonder if this is caste ignorance or actual viciousness at the part of whichever ad agency that made this video. I’m shocked at how terrible this is. There should be a FIR against @zomato for this casteist advert. https://t.co/4U5sWK3sXY
— Manak Matiyani (@Dafliwala) June 8, 2023
याआधी देखील झोमॅटो हे अॅप त्यांच्या एका जाहिरातीमध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. या अॅपच्या एका जाहिरातीमध्ये अभिनेता हृतिक रोशननं 'महाकाल की थाली' असा उल्लेख केला होता. ज्यामुळे झोमॅटोची ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यानंतर झोमॅटो कंपनीने या जाहिरातीवर स्पष्टीकरण देखील दिले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
अवघ्या 10 सेकंदात फूड डिलिवरी... बंगळुरुमधील फास्टेस्ट डिलिवरीचा व्हिडीओ होतोय व्हायरल