Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?
स्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात राजकीय सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याने वाल्मिक कराड पुरता अडकला आहे. दरम्यान, संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात असणाऱ्या सर्व आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उंच टाकीवर आंदोलन केल्यानंतर या आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरांगेही (Manoj Jarange) उतरले. संतोष देशमुखांची मनधरणी करताना, त्यांना टाकीवरून खाली उतरवून या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता धनंजय देशमुख तिसऱ्यांदा आंतरवली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मनोज जरांगे आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यात बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई होऊन वाल्मीक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, त्यामुळे या भेटीला महत्व होतं, दरम्यान या दोघांमध्ये अंतरवलीमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा झाली.