Viral: लवकरच दिसणार आकाशात उडणारी पहिली टॅक्सी? 2026 पर्यंत सुरू होणार 'फ्लाइंग टॅक्सी'? 'या' देशाने केली मोठी घोषणा! नेमकं सत्य काय?
Viral: आकाशात उडणारी ही टॅक्सी वर्ष 2026 पर्यंत सुरू होणार असल्याचे समजते. कारण या संबंधित घोषणा एका देशाने नुकतीच केलीय. जाणून घेऊया, नेमकं सत्य काय आहे?
Viral: भविष्यात तुम्हाला आकाशात उडणारी टॅक्सी दिसली, तर नवल वाटू देऊ नका. कारण लवकरच आता अशी एक टॅक्सी दिसणार आहे, जी खरोखर आकाशातून प्रवास करेल. इंग्रजीत ज्याला 'फ्लाइंग टॅक्सी' असे म्हणतात. ही टॅक्सी वर्ष 2026 पर्यंत सुरू होणार असल्याचे समजते. कारण या संबंधित घोषणा एका देशाने नुकतीच केलीय. जाणून घेऊया, नेमकं सत्य काय आहे?
'या' देशाकडून 2026 पर्यंत देशात फ्लाइंग टॅक्सीची घोषणा
ज्या देशाने ही मोठी घोषणा केलीय, तो देश युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरात आहे. या देशाने असा दावा केलाय की, 2026 पर्यंत फ्लाइंग टॅक्सी सुरू होईल. जॉबी एव्हिएशनचे जनरल मॅनेजर टायलर ट्रेरोटोला यांनी सांगितले की, त्यांनी 2026 च्या अखेरीस जॉबीची इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आखली आहे. UAE ने लंडनमध्ये ही मोठी घोषणा केली आहे. खरं तर, इथे त्याने आपली पहिली फ्लाइंग टॅक्सी लोकांसमोर आणली आहे. टॅक्सी दाखवताना यूएईने सांगितले की, या फ्लाइंग टॅक्सी 2026 पर्यंत देशात उपलब्ध होतील. ते म्हणाले की, आम्ही अशक्यही शक्य करून दाखवले. आजकाल UAE उद्योगपतींना येथे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी मोहीम राबवत आहे, फ्लाइंग टॅक्सी त्याचाच एक भाग आहे.
التاكسي الطائر بحلول عام 2️⃣0️⃣2️⃣6️⃣سيعمل في الامارت 🇦🇪 pic.twitter.com/Up0nKiyWx6
— الترند السعودي (@AlTrendAlsaudi) October 18, 2024
अशक्यही शक्य करून दाखवले - UAE
यूएईच्या या घोषणेने जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसाक UAE ने लंडनच्या अतिशय व्यस्त चेरिंग क्रॉस रेल्वे स्टेशनच्या बाहेर चमकदार पिवळ्या उडत्या टॅक्सीचे मॉडेल स्थापित केले आहे. सध्या या फ्लाईंग टॅक्सीचे मॉडेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मॉडेलच्या खाली 2026 मध्ये या टॅक्सी UAE च्या आकाशात उडतील असे लिहिले आहे.
फ्लाईंग टॅक्सीचे मॉडेल सोशल मीडियावर व्हायरल, अवघ्या जगाचे लक्ष वेधले
UAE गव्हर्नमेंट मीडिया ऑफिस (GMO) ने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2026 पर्यंत देशात फ्लाइंग टॅक्सी लागू करण्याच्या अमीरातच्या योजनेकडे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुढे म्हणाले की, आपल्या भविष्यातील दृष्टीचा एक भाग म्हणून, देश आपल्या गुंतवणूकदारांमध्ये जगभरातील मोठे विचारवंत आणि यश मिळविणाऱ्यांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
या 4 ठिकाणांहून फ्लाइंग टॅक्सी उपलब्ध होणार
आकाशात उडणारी ही टॅक्सी बनवणाऱ्या जॉबी एव्हिएशनचे जनरल मॅनेजर टायलर ट्रेरोटोला यांनी सांगितले की, 2026 च्या अखेरीस इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सुरू करण्याची त्यांची योजना आहे. या टॅक्सी देशातील तीन ते चार पॉइंटपर्यंत उपलब्ध असतील, असे त्यांनी सांगितले. ज्यामध्ये व्हर्टीपोर्ट दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (DXB), पाम जुमेराह, दुबई डाउनटाउन आणि दुबई मरीना यांचा समावेश असेल.
हेही वाचा>>>
Viral: नवरा भारतातला.. नवरी पाकिस्तानची.. भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नाचा ऑनलाइन व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून आश्चर्य
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )