Viral: हद्दच झाली राव..! शॅम्पू समजून महिलेने चक्क नदीतील विषारी फेसाने धुतले केस, व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप
Viral: छठपूजे दरम्यान एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये महिलेने असं काही केलंय, जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
Viral: मंगळवारपासून देशभरात छठ (Chhath Puja) या महान सणाला सुरुवात झाली आहे. हा उत्सव सुरू होताच अनेकांनी यमुनेच्या घाटावर पोहोचून यमुनेत स्नान केले. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही यमुनेची प्रदुषणामुळे दुरवस्था दिसून आली. एकीकडे नदीभोवती घाणीचे ढिगारे तर दुसरीकडे नदीत तरंगणारा विषारी फेस आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये महिलेने असं काही केलंय, जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. जाणून घ्या
'नाईलाजास्तव यमुनेत स्नान करावं लागतंय'
आज 7 नोव्हेंबर म्हणजेच आज सकाळी सूर्य अर्घ्य देऊन या महान उत्सवाची सांगता होत आहे. छठ पुजेच्या नहाय-खायच्या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार भाविक पहाटे नदीच्या घाटावर पोहोचतात आणि स्नान करतात. दिल्लीतील भाविकही स्नान आणि डुबकी मारण्यासाठी यमुनेला पोहोचले. मात्र यमुनेमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी, घाण आणि विषारी फेस आहे. अशा परिस्थितीत लोकांना सध्या त्यांच्या श्रद्धेपोटी आणि परंपरा पूर्ण करण्यासाठी यमुनेत स्नान करावे लागते. अशात एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
नदीतील विषारी फेसला 'ती' शॅम्पू समजली..!
छठ पूजेदरम्यान दिल्लीतील यमुना नदीकाठावरील एक व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये असे दिसत आहे की, एका वृद्ध महिलेने चक्क यमुना नदीतील प्रदूषणामुळे जो फेस तयार झाला आहे, त्याला शॅम्पू समजून तिने तिचे केस धुण्यास सुरुवात केली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यमुनेची अवस्था पाहून भाविक चिंतित
यमुनेची अवस्था पाहून नदीत स्नान करणारे भाविक दुःखी झाल्याचे पाहायला मिळाले. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, छठपूर्वी यमुना स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून यमुनेची स्थिती सातत्याने बिघडत असून त्यांना यमुनेत स्नान करावे लागत आहे. काही लोक म्हणतात की, यमुनेत स्नान केल्याने आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे घराभोवती पाण्याचा कृत्रिम घाट घालून छठचा मोठा सण साजरा करणार आहेत. तर काही सोसायट्या, परिसर इत्यादी ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन घाट बांधले आहेत आणि पूजा करून उत्सव आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरा करत आहेत. ज्यांना छठपूजेसाठी घाटावर जाता येत नाही, ते घराच्या छतावर एका मोठ्या टबमध्ये उभे राहून सूर्यदेवाला अर्घ्य देतात. 7 नोव्हेंबर म्हणजेच आज सकाळी सूर्य अर्घ्य देऊन या महान उत्सवाची सांगता होत आहे.
दिल्लीत यमुनेची स्थिती सर्वात वाईट
एकीकडे दिल्ली सरकारचा दावा आहे की दिल्लीत 1000 हून अधिक छठ घाट बांधले गेले आहेत आणि छठच्या उत्सवादरम्यान दिल्लीतील कोणत्याही भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुरक्षा, स्वच्छता इत्यादीची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, इथले चित्र काही वेगळेच सांगत आहेत. दिल्लीतील कालिंदी कुंज भागातील यमुनेची स्थिती इतकी वाईट आहे की यमुनेच्या पाण्यावर बर्फाच्या चादरप्रमाणे विषारी फेस तरंगताना दिसत आहे. वर्षानुवर्षे केजरीवाल सरकार यमुना स्वच्छ करण्याचे दावे आणि आश्वासने देत आहे. असे असूनही परिस्थिती बिकट होत चालली आहे. यावरून राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
हेही वाचा>>>
Viral: 'बाई...काय प्रकार!' देवाचे चरणामृत समजून, भक्त AC चं पाणी पितायत? 'या' मंदिरातील भाविकांचा व्हिडीओ व्हायरल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )