Dombivli Blast: डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहताला 29 मेपर्यंत पोलीस कोठडी, आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टात गैरहजर
Dombivli MIDC Explosion : पोलिसांनी आज केवळ मलय मेहताला न्यायालयासमोर हजर केलं असून त्यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाणे : डोंबिवली स्फोटातील (Dombivli MIDC Explosion) आरोपी मलय मेहता याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मालती मेहता गंभीर आजारी आहेत शिवाय त्यांचं वय जास्त असल्यानं त्यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान मालती मेहता यांची केवळ चौकशी करण्यात आलीय. त्यामुळे पोलिसांनी आज केवळ मलय मेहताला न्यायालयासमोर हजर केलं असून त्यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डोंबिवलीमध्ये झालेल्या गॅसच्या स्फोटात सर्च ऑपरेशन अजुनही सुरु आहे. तसंच जोपर्यंत शेवटचा मीसिंग व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत आमचे सर्च ऑपरेशन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया एनडीआरएफचे सारंग कुर्वे यांनी दिलीय. दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिकमधील मेहेरधाम परिसरातून पोलिसांनी त्यांना शुक्रवारी ताब्यात घेतलं होते.तर मलय मेहत यांना ठाण्यातून ताब्यात घेतले होते.
डोंबिवलीची दुर्घटना हा अपघात, कंपनी मालकाच्या वकिलांचा युक्तिवाद
मुख्य आरोपी मालती मेहता या आजारी असल्याने पोलिसांनी केवळ मलय मेहता यांनाच आज न्यायालयासमोर हजर केले. मालती मेहता यांना पोलिसांनी हजर केले नाही. न्यायाधीश श्रीमती एस ए पठाण यांच्या समोर झाली सुनावणी झाली. अॅड. सम्राट ठक्कर यांनी मेहता यांची बाजू मांजली. मेहता यांची बाजू मांडताना ठक्कर यांनी युक्तीवाद केला की, जे झाले तो एक अपघात होता. 17 वर्षांपासून तिथे फॅक्टरी आहे पण कधी असे झाले नाही. हिट असल्याने कधी कधी केमिकल रिअॅक्ट करतात, त्यामुळे हा पूर्णतः अपघात आहे. कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मेहता देखील स्वतः त्या ठिकाणी असते, पण ते 45 मिनिटे उशिरा निघाले म्हणून फॅक्टरीवर उशिरा पोहोचले, त्यामुळे वाचले. बाकी हा विषय कोर्टात असल्याने काही बोलणार नाही.
कोर्टात झालेला युक्तिवाद जसाच्या तसा
पोलिसांचा युक्तिवाद : 14 दिवसांची पोलीस कोठडी हवी, कंपनीने कागदपत्रांची पूर्तता केली होती का? परवानग्या घेतल्या होत्या का? आतमध्ये साठा किती होता? अशा अनेक गोष्टींचा तपास करायचा असल्याने 14 दिवस पोलीस कोठडी द्यावी...
मेहता यांच्या वकिलांचा युक्तिवाद - सम्राट ठक्कर यांनी मेहता यांची बाजू मांडली, जे झाले तो एक अपघात होता, 17 वर्षांपासून तिथे फॅक्टरी आहे पण कधी असे झाले नाही, हिट असल्याने कधी कधी केमिकल रिऍक्ट करतात, त्यामुळे हा पूर्णतः अपघात आहे.
हे ही वाचा :
डोंबिवली स्फोटानंतर राकेश बेपत्ता, रडवेला चेहऱ्याने भाऊ-बायको कंपनीच्या दारात; मालकाची मग्रुरी अन् पोलिसांकडून लाठीचे फटके
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
