डोंबिवली स्फोटानंतर राकेश बेपत्ता, रडवेला चेहऱ्याने भाऊ-बायको कंपनीच्या दारात; मालकाची मग्रुरी अन् पोलिसांकडून लाठीचे फटके
Dombivli MIDC Blast News: भरत जयस्वाल पंधरा दिवसांपूर्वीच अनुदान कंपनीत कामाला लागले होते, परवा झालेल्या स्फोटानंतर ते अजूनही सापडले नाहीत असा दावा त्यांच्या भावाने केला आहे.
![डोंबिवली स्फोटानंतर राकेश बेपत्ता, रडवेला चेहऱ्याने भाऊ-बायको कंपनीच्या दारात; मालकाची मग्रुरी अन् पोलिसांकडून लाठीचे फटके Dombivli MIDC Blast News missing workers relatives are beaten by police owner also angry डोंबिवली स्फोटानंतर राकेश बेपत्ता, रडवेला चेहऱ्याने भाऊ-बायको कंपनीच्या दारात; मालकाची मग्रुरी अन् पोलिसांकडून लाठीचे फटके](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/25/79b72477fb5677d18cf44005d2917491171662249628589_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण - डोंबिवली : डोंबिवली (Kalyan Dombivli News) येथे झालेल्या औद्योगिक स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला मात्र अजूनही सहा जणांची ओळख पटली नसून काही जणांचे तर केवळ अवशेष सापडल्याने नातेवाईकांमध्ये संभ्रमाचे (Dombivli MIDC Blast News) वातावरण आहे. कारण दोन कामगारांचे नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून या कंपनीच्या शेजारीच दिवसरात्र वाट बघतायत. दुर्दैवाची बाब म्हणजे या नातेवाईकांना अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्याच्या ऐवजी पोलिसांकडून काठीचे फटके खावे लागत आहेत.पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम आणि त्यांची टीम प्रसारमाध्यमांशी देखील अशाच प्रकारे वागणूक करताना दिसतायत. या स्फोटात भरत जयस्वाल बेपत्ता झालेत. भरत जयस्वाल पंधरा दिवसांपूर्वीच अनुदान कंपनीत कामाला लागले होते, परवा झालेल्या स्फोटानंतर ते अजूनही सापडले नाहीत असा दावा त्यांच्या भावाने केला आहे.
एन डी आर एफ पथकाकडून काही नवीन सापडते आहे का यासाठी ते डोळे लावून बसले आहेत. मात्र त्यांना त्यांच्या बेपत्ता नातेवाईकाचा शोध लागत नाहीये. काहींचे डीएनए रिपोर्ट बाकी आहे. कोणी आपला नवरा, कोणी भाऊ, कोणी मुलांसाठी वाट पाहत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या नातेवाईकांना अतिशय संवेदनशील पणे हाताळण्याच्या ऐवजी पोलिसांकडून काठीचे फटके खावे लागत आहेत. अरेरावीची भाषा त्यांच्यासोबत वापरली जात आहे, त्यांना अक्षरशः हाकलून दिले जात आहे त्यामुळे आधीच दुःखात असलेल्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार प्रशासन करत आहेत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नातेवाईकांना उद्धट उत्तरे
एबीपी माझाशी बोलताना बेपत्ता राकेश राजपूतच्या पत्नी म्हणाल्या, तीन दिवस झाले माझा पती घरी आलेला नाही. पोलिसात देखील तक्रार केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पोलीस काहीच करत नाही. मालक देखील एका कानाने ऐकतो आणि एका कानाने ऐकून सोडून देतो. का नाही हालचाल करतात? उलट आम्हाला उद्धट उत्तरे देत आहे. आम्हाला पोलीसांनी हाकलून लावले. माझ्या दिराला दोन-तीन फटके मारले. आम्ही आमच्या घरच्यांची माहिती विचारायला आलो हा गुन्हा आहे का? आम्हाला का मारले?
डोंबिवली दुर्घटनेला 45 तास उलटले
डोंबिवली दुर्घटनेला 45 तास उलटले आहे तरी शोधकार्य सुरू आहे. आपल्या माणसाची वाट पाहत आहे. मात्र प्रशासनाकडून ज्या पद्धतीने कामगारांच्या नातेवाईकांची हेळसांड होत आहे. त्यावरून गरीबांच्या जीवाची किंमत आहे का? असा सवाला उपस्थित होत आहे.
Video :
हे ही वाचा :
डोंबीवलीतील शक्तिशाली स्फोटाची विदारक कहाणी, मृतदेहाचे अवयव छतावर; 45 तासांनंतरही शोधकार्य सुरूच!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)