ग्रामस्थांचा अनोखा निर्णय; सावर्डे परीसरातील 22 गावात दारू विक्री बंद
दहिवली बुद्रुक या गावात ग्रामदैवत वरदान मानाईच्या मंदिरात ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामदेवतेच्या साक्षीने गावात दारुबंदी संकल्पना राबविली आहे.
रत्नागिरी : शिवसेना-भाजप सरकारच्या काळात 2019 साली दारु बंदीवरील (Darubandi) काही निर्देश कमी करुन दारु विक्रीला पुन्हा सुरुवात केली. महामार्गावरील बंद पडलेले दारु विक्री धंदे पुन्हा सुरु झाले. एवढेच नाही तर त्यावेळच्या सरकारने गाव तिथे दारु दुकान अशा प्रकारचे नव धोरण राबविले.त्यामुळे तळीरामांना त्याचा फायदा चांगलाच झाला. मात्र कोकणातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे परीसरातील 22 गावांनी दारु बंदचा ठराव करुन गावात दारु विक्री बंद (Alcohol Ban) केली
दहिवली बुदृक या गावात ग्राम दैवत वरदान मानाईच्या मंदिरात ग्रामस्थांनी एकत्रित येउन ग्रामदेवतेच्या साक्षीने गावात दारुबंदी संकल्पना राबविली. तर गावच्या ग्रामपंचायतीमधील सदस्य व महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांच्या संगमताने दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी एकमुखी ठराव करण्यात आला. या सभांना गावातील अवैध दारूविक्री,हातभट्टी दारु व्यवसायिकांना बोलवून त्यांनाही याची कल्पना देण्यात आली. त्यांनीही गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले असून दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचे ठरविण्यात आले.
दारू विक्री कायमस्वरूपी बंद
या ठरावाची अंमलबजावणी म्हणून गावच्या सरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य यांनी एक निवेदन तयार करून सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांना दिले. तसेच गावामध्ये अवैध दारूविक्री व्यवसाय व हातभट्टी व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना वैयक्तिक नोटीस पाठवून अवैध होणारी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात आली.
दारुचे अनेक दुष्परिणाम
भारतात जवळपास वीस कोटी माणसं दारु पितात, त्यापैकी पाच कोटी हे दारू -दुष्परिणाम-ग्रस्त’आहेत व त्यापैकी दरवर्षी पाच लक्ष मरतात. हा झाला दारुचा जमाखर्च. कोरोनाला थांबविण्यासाठी भारताने दारु व तंबाखूविक्री बंद केली आहे. कोरोनामुळे आजपर्यंत देशात दोन हजार मृत्यू झाले. दारुमुळे दरवर्षी पाच लक्ष व तंबाखूमुळे दहा लक्ष मृत्यू होतात. कोरोनाच्या निमित्ताने दारू व तंबाखू बंदी किंवा कमी झाल्यास अनेक पट मोठा फायदा होईल.
दारूमुळे गावात अनेक महिलांचे संसार उघडे उघड्यावर पडण्याची भिती निर्माण झालेली आहे.नवयुवक वर्ग हा व्यसनाधिनतेच्या मार्गाकडे चालला आहे.गावातील अनेक तरुण व अल्पवयीन मुले दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत.दारूच्या व्यसनापासून भावी पिढी दूर राहावी अशी सर्व ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली आहे. अवैध दारुधंदे मुक्त गाव संकल्पना राबविण्याचा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेऊन रत्निगिरी जिल्ह्यातील इतर गावांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
हे ही वाचा: