एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठ्यांसाठी मुस्लिम मावळे एकवटले; पुण्यात मुस्लिम बांधवांकडून 'एक मराठा, लाख मराठा'चा गजर

Pune Muslim Brothers Protest : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा (Maratha Reservation) देण्यासाठी पुण्यात मुस्लिम (Muslim Protest) समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरू केले. राज्यभरही मराठा समाजबांधवांचे उपोषण सुरू आहे. याच मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून पुण्यात लाक्षणिक उपोषण केलं जात आहे. 

मराठ्यांसाठी मुस्लिम मावळे एकवटले

पुण्यात विविध ठिाकणी सकल मराठा समाज बांधव हे साखळी उपोषण करत आहे. समाजाला शासनाने आरक्षण द्यावे ही मागणी रास्त असून शासनाने आरक्षणाबाबत तातडीने कार्यवाही करावी, मराठा समाजाला न्याय द्यावा, यासाठी पुण्यात मुस्लिम समाजाने पाठिंबा दिलेला आहे. तरी शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होईल, असेही मुस्लिम बांधवांनी सांगितले आहे. 

मुस्लिम मावळ्यांकडून एक मराठा लाख मराठाचा गजर

मराठा आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या मराठ्यांना साखळी आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनानंतर राज्यात सगळीकडे साखळी उपोषण सुरु आहे. त्यातच पुण्यातही अनेक ठिकाणी राखळी उपोषण केलं जात आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे, बोपोडी आणि शिवाजीनगर येथील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चासह अनेक मराठा संघटनांनी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे या भागात राजकीय नेत्यांना गावबंदी  करण्यात आली आहे.

आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही; मनोज जरांगे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे म्हणाले, आपण मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी, आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच ओबीसीमध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे, त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. मराठवाड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या,समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मराठा आंदोलनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा; पोलीस महासंचालकांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Utsav 2025 : पीओपी गणेश मूर्तीचा वाद सध्यापूरता मिटवला, सरकारची पुढची भूमिका काय?
पीओपी गणेश मूर्तीचा वाद सध्यापूरता मिटवला, सरकारची पुढची भूमिका काय?
Air India : एअर इंडियाच्या विमानात तुटलेली खूर्ची मिळाली, शिवराज सिंह भडकले, टाटांचा उल्लेख करत सगळंच काढलं
पूर्ण पैसे घेतल्यावर तुटलेल्या खूर्चीवर बसावं लागणं अनैतिक, प्रवाशांसोबत हा धोका नाही का? :शिवराज सिंह चौहान
तारकर्ली समुद्रात जाण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन पर्यटक बुडाले; दोघांचा दुर्दैवी अंत
तारकर्ली समुद्रात जाण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन पर्यटक बुडाले; दोघांचा दुर्दैवी अंत
Joint Chiefs of Staff CQ Brown : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता देशांतर्गत विरोधक संपवण्यास सुरुवात! सर्वात शक्तीशाली कृष्णवर्णीय लष्करी अधिकाऱ्याला तडकाफडकी हटवलं
डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात शक्तीशाली कृष्णवर्णीय लष्करी अधिकाऱ्याला तडकाफडकी हटवलं; 2020 मधील पराभवास कारण ठरलेल्या 'त्या' आंदोलनाचा बदला घेतल्याची चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Dargah Issue | नाशिकमधील अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनIdeas of India 2025 : Gaur Gopal Das, Motivational Speaker, and Monk | ABP MajhaManikrao Kokate Special Report : बंदुकीच्या लायसन्समुळे कोकाटेंचं बिंग फुटलं,राजीनामा कधी? : विरोधकKIshor Tiwari : उद्धव ठाकरेंशी कधीच संवाद झाला नाही, शिवसेनेत समन्वय नावाची गोष्ट नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Utsav 2025 : पीओपी गणेश मूर्तीचा वाद सध्यापूरता मिटवला, सरकारची पुढची भूमिका काय?
पीओपी गणेश मूर्तीचा वाद सध्यापूरता मिटवला, सरकारची पुढची भूमिका काय?
Air India : एअर इंडियाच्या विमानात तुटलेली खूर्ची मिळाली, शिवराज सिंह भडकले, टाटांचा उल्लेख करत सगळंच काढलं
पूर्ण पैसे घेतल्यावर तुटलेल्या खूर्चीवर बसावं लागणं अनैतिक, प्रवाशांसोबत हा धोका नाही का? :शिवराज सिंह चौहान
तारकर्ली समुद्रात जाण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन पर्यटक बुडाले; दोघांचा दुर्दैवी अंत
तारकर्ली समुद्रात जाण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन पर्यटक बुडाले; दोघांचा दुर्दैवी अंत
Joint Chiefs of Staff CQ Brown : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता देशांतर्गत विरोधक संपवण्यास सुरुवात! सर्वात शक्तीशाली कृष्णवर्णीय लष्करी अधिकाऱ्याला तडकाफडकी हटवलं
डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात शक्तीशाली कृष्णवर्णीय लष्करी अधिकाऱ्याला तडकाफडकी हटवलं; 2020 मधील पराभवास कारण ठरलेल्या 'त्या' आंदोलनाचा बदला घेतल्याची चर्चा
Nashik News : नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन; महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात, अनिकेत शास्त्री नजरकैदेत
नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन; महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात, अनिकेत शास्त्री नजरकैदेत
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत अन् चीनला दणका, म्हणाले, 'जशास तसं सूत्र' राबवणार, रेसिप्रोकल टॅरिफ लागू करणार
तुम्ही जितका टॅक्स लावता तितकाच लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह चीनला दणका, रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा
60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ लीक; युट्यूबरसह सांगली आणि लातूरमधील दोघांना बेड्या!
60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ लीक; युट्यूबरसह सांगली आणि लातूरमधील दोघांना बेड्या!
IND vs PAK : भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 'त्या' आकडेवारीमुळं रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार
भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 'ती' आकडेवारी टेन्शन वाढवणारी
Embed widget