एक्स्प्लोर

मराठा आंदोलनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा; पोलीस महासंचालकांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Maratha Reservation : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सोमवारी कायदा आणि सुव्यवस्थेची बैठक पार पडली. तासभर चाललेल्या बैठकीत पोलीस महासंचालकांनी राज्यभरात झालेलं मराठा आंदोलन आणि त्यादरम्यान झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांचा आढावा समोर ठेवला.

Maharashtra Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान राज्यात झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांच्या (DCM) उपस्थितीमध्ये काल (सोमवार, 30 ऑक्टोबर, 2023) कायदा आणि सुव्यवस्थेची बैठक पार पडली. रात्री दहा ते अकरा अशी एक तास बैठक चालली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये आंदोलनादरम्यान मालमत्तेचा आणि जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे, गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, राज्यात हिंसक वातावरण तयार होत असेल, तर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या बैठकीला राज्यातले सर्व जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सोमवारी कायदा आणि सुव्यवस्थेची बैठक पार पडली. तासभर चाललेल्या बैठकीत पोलीस महासंचालकांनी राज्यभरात झालेलं मराठा आंदोलन आणि त्यादरम्यान झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांचा आढावा समोर ठेवला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. या समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरू आहे. घरं जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे. जे या आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात. या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या करत आहेत. गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. 

सीएम डीसीएम आणि पोलीसांच्या बैठकीत काय काय घडलं?

  • पोलीस महसंचालक यांनी दिवसभराच्या घडामोडींचा आढवा समोर ठेवला.
  • मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत.
  • या समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरू आहे.
  • घरं जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे. जे या आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात. 
  • या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या करत आहेत
  • गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहेत.

राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक 

मराठा आंदोलनाबाबत सरकार गंभीर असल्याचा संदेश देत मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीच्या माध्यमातून मराठा आंदोलन, सद्य स्थिती आणि कायदा, सुव्यवस्था यांचा आढावा घेणार आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget