(Source: Poll of Polls)
कायदा सुव्यवस्था धाब्यावर अन् गुंड डोक्यावर; उल्हासनगर गोळीबार प्रकरणी शरद पवार गटाचा सरकारवर हल्लाबोल
Ulhas Nagar Crime News : या सरकारने महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली असून गुंड आणि हल्लेखोरांना डोक्यावर बसवले असल्याची.' टीका शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
मुंबई: उल्हासनगरमध्ये (Ulhas Nagar Crime) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण देखील तापले आहेत. दरम्यान, शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) देखील यावरून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. 'या सरकारने महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली असून गुंड आणि हल्लेखोरांना डोक्यावर बसवले असल्याची,' टीका शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "भाजप संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गणपत गायकवाड यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षांचे आमदार आणि नेतेच जर अशी गुंडगिरी करणार असतील, तर जनतेने स्वतःचं संरक्षण कोणाकडून अपेक्षित करावं? या सरकारने महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली असून गुंड आणि हल्लेखोरांना डोक्यावर बसवले आहे, हेच या प्रकरणावरून दिसत असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
भर पोलीस चौकीत गोळीबार...
तर गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस चौकीत शिंदे गटातील माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्या. जमिनीच्या वादावरून धक्काबुक्की केल्याने त्यांनी गोळ्या झाडल्या असं त्यांचं म्हणणं आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुन्हेगारी पसरवत आहेत, राज्यात गुंड निर्माण करत आहेत, उद्धव ठाकरे यांच्या गद्दारी केली, आता भाजप संपवण्याचा ते प्रयत्न करत आहेत,' असे गंभीर आरोप स्वतः गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड करत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावरही गणपत गायकवाड यांनी मनमानी कारभाराचे आरोप लावले आहेत, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहेत.
सुप्रिया सुळे आक्रमक...
याच गोळीबार प्रकरणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. 'राज्य भरडला जातोय, आपण वर्दीचा मान ठेवणारे लोक आहोत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माहेर म्हणून जातो की पोलीस आम्हाला हक्क मिळवून देतील. मात्र, दिवसा ढवळ्या भांडणे होतात आणि आमदारांची हिम्मत कशी होते?, फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. भाजपचा आमदार आहे म्हणून काहीही करेल का? मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवावा, याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांसमोर हे होत असेल तर हे गुंडाराज आहे, एवढी यांना सत्तेची मस्ती? गुंडराज नाही तर काय? असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केला आहे. महाराष्ट्राची बदनामी गँगवॉर सरकारने केली असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: