Maharashtra Political Crisis : हे 5 न्यायमूर्ती देणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल!
Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पाच न्यायमूर्तीचं खंडपीठ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल देणार आहेत हे 5 न्यायमूर्ती
Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पुढचे काही तास त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक निर्णायक केस म्हणून या प्रकरणाचं महत्त्व कायम राहिल. हे प्रकरण जून 2022 मध्ये सुप्रीम कोर्टात आलं. पण त्यावर 8 महिन्यांनी सुनावणी सुरु झाली. सत्तासंघर्षाच्या कायदेशीर लढाईत 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी मॅरेथॉन सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मणिंदर सिंह, राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केले.
आता पाच न्यायमूर्तीचं खंडपीठ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. या खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचा समावेश आहे. जाणून घेऊया या पाच न्यायमूर्तींबाबत...
1. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये शपथ घेतली
आधी अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि 2016 पासून सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती
दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमधून बी ए इकॉनॉमिक्स, त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून एलएलबी
चंद्रचूड हे महाराष्ट्रीयन आहेत, त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश होते
समलिंगी संबंधाना गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढणं, सबरीमलामध्ये महिलांचा प्रवेश, लष्कराच्या परमंटन कमिशनमध्ये महिलांना स्थान अशा ऐतिहासिक निर्णयांमध्ये सहभाग
सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान केलेल्या टिप्पणींमुळे सोशल मीडियावर ते उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून ट्रोलही झाले होते
2. न्यायमूर्ती एम आर शाह
न्या. एम आर शाह उर्फ मुकेशभाई रसिकलाल शाह हे मूळचे गुजरातचे
2005 मध्ये गुजरात हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती
2018 मध्ये पाटणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि 2018 मध्येच त्यांना सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून आणलं
शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत
गुजरातमधले आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या केसमध्ये हायकोर्टात शाह यांनीच कडक ताशेरे ओढले होते
3. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी
अलाहाबाह विद्यापीठातून एलएलबी करत त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात 22 वर्षे वकिलीही केली
2005 मध्ये अलाहाबाद हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती
2018 मध्ये पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती
तिथून 2019 मध्ये त्यांची सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती
4. न्यायमूर्ती हिमा कोहली
दिल्ली विद्यापीठातून बी एचं शिक्षण पूर्ण त्यानंतर दिल्ली विद्यापीठातच एलएलबी
1987 पासून वकिलीला सुरुवात, 1994 मध्ये कर्नाटक हायकोर्टात न्यायमूर्ती
31 ऑगस्ट 2021 पासून त्या सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त
कोर्ट्स ऑफ इंडिया या पुस्तकाच्या लेखिका, 2027 पर्यंत त्यांचा सुप्रीम कोर्टातला कार्यकाळ असेल
5. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा
1963 मध्ये हैदराबादमधल्या न्यायाधीश कुटुंबात जन्म
सुरुवातीची काही वर्षे वकिली, 2008 पासून सुप्रीम कोर्टात सिनीयर अॅडव्होकेट म्हणून कार्यरत
थेट वकिलीतून सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बनलेले खूप कमी लोक असतात, त्यापैकी एक
2021 पासून त्यांना सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं