एक्स्प्लोर

Sharad Pawar : जे जे सोडून गेले त्या प्रत्येकाचा हिशोब होणार, शरद पवारांकडून 5 मंत्र्यांचा 'कार्यक्रम' करण्यासाठी खास प्लॅन

Sharad Pawar Against 5 Minister of NCP Ajit Pawar : शरद पवारांनी सोडून गेलेल्या 5 मंत्र्यांना घेरण्यासाठी नवे चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखली आहे.

Sharad Pawar Against 5 Minister of NCP Ajit Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोडून गेलेल्या लोकांच्या मतदारसंघात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 2023 मध्ये सोडून गेलेल्या लोकांच्या विरोधात शरद पवारांनी रणनिती आखण्या सुरुवात केली आहे. ज्या मंत्र्यांना कठिण काळात मदत केली, मार्गदर्शन केले त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवार उत्सुक असल्याचं चित्र आहे. मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, अर्थमंत्री अजित पवार, माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शरद पवारांनी शड्डू ठोकलय. 

शरद पवारांनी संबंधित मंत्र्यांच्या मतदारसंघात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. दिग्गज नेत्यांना आव्हान देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात नवे चेहरे उभे केले आहेत.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रत्येक मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा? याबाबत शरद पवारांचे विशेष लक्ष आहे. पुण्यात त्यांनी 1200 पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोडून गेलेल्या लोकांविरुद्ध कडवी झुंज देण्यासाठी भाजपमधल्या अनेकांना पक्षात प्रवेश दिला जातोय. दत्तात्रय भरणे, धनंजय मुंडे ज्यांनी पक्ष फुटल्यानंतर अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याविरोधात शरद पवारांनी खास प्लॅन आखलाय. 

राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्या नव्या रणनीतीवर विश्वास व्यक्त केलाय. “पक्षांतरानंतरही कार्यकर्ते आणि मतदार पवार साहेबांच्या पाठीशी आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही हे पाहिलं आणि मला यावेळीही अशाच वातावरणाची अपेक्षा आहे", असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. 

कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात शरद पवारांचा डाव 

कागल विधानसभेतून हसन मुश्रीफ पाच वेळेस निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी शरद पवारांनी समरजीत घाटगेंना भाजपमधून आयात केलं आहे. घाटगे यांनी यापूर्वी मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे.  परंतु मतांच्या विभाजनामुळे त्यांचा पराभव झाला होता. "यावेळची निवडणूक विकासाची होणार असून, कागलमध्ये परिवर्तन होईल, असा मला विश्वास आहे," असा विश्वास समरजीत घाटगेंनी व्यक्त केलाय. 

हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन भरणे मामांना घेरलं

इंदापूरमध्ये पवारांनी भाजपचे माजी नेते हर्षवर्धन पाटील यांना भरणे यांच्याविरोधात उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या दत्तात्रय भरणे यांनी केवळ 3 हजार मतांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीत इंदापुरातून सुप्रिया सुळेंना मोठा लीड मिळाल्याने हर्षवर्धन पाटलांना आत्मविश्वासही वाढला आहे. "पवार साहेबांच्या पाठिंब्याने आम्ही अर्धी लढाई आधीच जिंकली असून, आगामी निवडणुकीत आमचा विजय होईल, असा मला विश्वास आहे", असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. 

धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात त्यांच्याच मुलीला मैदानात उतरवण्याची शक्यता 

गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. आत्राम यांच्याविरोधात त्यांच्यात कन्येला उभा करण्याचा शरद पवारांचा डाव आहे. 

 देवदत्त निकमांना उमेदवारी देऊन वळसे पाटलांना घेराव घालण्याची शक्यता 

मंचरचे आमदार असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनाही लक्ष्य करण्याची पवारांची रणनीती आहे. यापूर्वी वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या देवदत्त निकम यांच्या मागे थोरल्या पवारांनी आपली ताकद लावली आहे. मागील निवडणुकीनंतर नाराज झालेल्या काही लोकांनी देवदत्ता निकम यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. 

मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधातही पवारांची रणनीती 

शरद पवारांनी नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार निश्चित केला नसला तरी त्यांनी तिथून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली होती.  नुकत्याच त्यांनी काही स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन येवल्यात ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलाय. “आमचा पक्ष येवला जिंकण्यासाठी कटीबद्ध आहे. या मतदारसंघात पवार साहेबांना भक्कम पाठिंबा आहे", असं येवल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष विठ्ठल शेलार म्हणाले आहेत. 

कोठे कोणत्या लढती होऊ शकतात?

कागल , कोल्हापूर - हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे 

मंचर, पुणे - दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्ता निकम 

इंदापूर , पुणे - दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील 

अहेरी , गडचिरोली - धर्मराव आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम 

बारामती, पुणे  - अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार 

इतर महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला बहुमान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Singham Again Worldwide BO Collection: सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
Embed widget