एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?

Mahayuti mantrimandal allocation: महायुतीच्या खातेवाटपाबाबत महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसला कोणकोणती खाती मिळणार? दत्तामामा भरणेंना लागली लॉटरी

मुंबई: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आटोपल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिलेले खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याविषयी प्रचंड तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या खात्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती येण्याची शक्यता आहे. (Ajit Pawar NCP Cabinet portfolio list)

अर्थ व नियोजन, महिला व बालकल्याण, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व बंदरे, मदत पुनर्वसन, अन्न नगरी पुरवठा व अन्न औषध प्रशासन ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यात राज्य उत्पादन शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादी ला मिळेल, असे सांगितले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क हा विभाग अजित पवार स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

महायुती सरकारने 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. यावेळी 32 कॅबिनेट आणि 7 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यामध्ये भाजपच्या 21, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश होता. तेव्हापासून सर्वांना खातेवाटपाची उत्सुकता लागली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ, उत्पादन शुल्क, सहकार, कृषी ही तगडी खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहेत. खातेवाटपासोबतच प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. 

अजित पवारांच्या कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार?

सहकार- मकरंद पाटील 
अर्थ व नियोजन- अजित पवार 
महिला व बालकल्याण- आदिती तटकरे 
कृषी- दत्तामामा भरणे 
वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ 
अन्न व नागरी पुरवठा- धनंजय मुंडे 

एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळणार?

या खातेवाटपात एकनथ शिंदे यांनी मागणी केलेले गृह खाते भाजप त्यांना सोडणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, भाजप शिवसेनेसाठी नगरविकास खाते सोडण्यास राजी झाला आहे. याशिवाय, गृहनिर्माण खातेही शिवसेनेला देण्यात येणार असल्याची माहिती आहे.  या खातेवाटपानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कसे सूर उमटणार, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भाजप-

  • गृह 
  • महसूल
  • सार्वजनिक बांधकाम
  • पर्यटन
  • ऊर्जा

---------

शिवसेना-

  • नगरविकास खातं
  • गृहनिर्माण

---------

राष्ट्रवादी-

  • अर्थ
  • महिला आणि बालविकास
  • उत्पादन शुल्क

आणखी वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Patil VidhanSabha Speech: द्राक्षांचा प्रश्न..भलेभले चाट पडतील असं रोहित पाटलांचं अभ्यासू भाषणMaharashtra Superfast News 18 December 2024 ABP MajhaMaratha Supporters Gunratn Sadavarte :तुळजापुरात गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमकChhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Sara Tendulkar : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Video : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Embed widget