Chhagan Bhujbal on Bjp : केंद्रीय तपास यंत्रणा भाजप नेत्यांवर कारवाई का करत नाही? : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal on Bjp : एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाची फेरी सुरू असताना आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही भाजपाला लक्ष केलं आहे.

Chhagan Bhujbal on Bjp : एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाची फेरी सुरू असताना आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही भाजपाला लक्ष केलं आहे. पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले आहेत की, सध्या जे राजकारण सुरू आहे ते कोणाला अभिप्रेत नाही. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते यावेळी भाजपचं नाव न घेता म्हणाले आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या नेत्यांवर कारवाई का करत नाही : भुजबळ
भुजबळ म्हणाले आहेत की, सीबीआय ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांनी (Central Investigation Agency) कोणत्याही दबावाखाली न येता निष्पक्षपणे कारवाई करायला हवी. त्यांना फक्त विरोधी पक्ष आणि सरकारी (महाविकास आघाडी सरकार) पक्षामधील नेतेच सापडतात. भाजमध्ये असे नेते नाही आहेत का? भाजपमधील नेत्यांनी काय काय केलं आहे, हे दाखवण्याचं काम आता सरकारी पक्षामधील काही नेते करत आहेत.'' तसेच काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपाला दिला आहे.
मी या त्रासातून गेलो आहे : भुजबळ
भुजबळ पुढे म्हणाले, माझ्यावर अनेक घोळयांचे आरोप झाले. मी या त्रासातून गेलो आहे. लोकांना आधी हे आरोप खरे वाटले. मात्र नंतर न्यायालयाने माझ्यावरील केस डिस्चार्ज केले. माझी लढाई अजूनही सुरू आहे. हे सर्व जे सुरू आहे. हे ठरवून काही लोकांना टार्गेट केलं जात आहे, हा आरोप सातत्याने भारत सरकारवर केला जात आहे. यामध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री (केंद्रीय) यांचा थेट संबंध किती? याची आम्हाला कल्पना नसल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, भुजबळ यांच्या प्रापर्टीची पाहणी केल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, आम्ही कोणाकडेही तक्रार केलेली नाही, परंतु कोविड काळामध्ये कोणीही जमाव करू नये आणि अंतर पाळावे म्हणून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जे काही नियम लागू होते. त्या नियमाचा भंग झाल्याने पोलिसांनी सोमय्या यांना नोटीस बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
